मानसिंगकानगर कडे जाणारा मुख्य रस्ता दुरुस्त करा ; स्थानिक राहिवाश्यांचे पालिकेला निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०७/२०२३

पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील व सुशील डेअरी शेजारील मानसिंगका नगर सह इतर पाच ते सहा कॉलन्यांना जोडणाऱ्या एकमेव असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून त्यामुळे येन पावसाळ्यात वाहनधारकांसह पादचारी, विविध शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने पाचोरा नगरपालिकेने तात्काळ हा रस्ता नवीन तयार करावा किंवा मूळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांनी निवेदनाद्वारे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी सौ. शोभाताई बाविस्कर यांच्याकडे केली आहे.

या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून आता पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी साचल्यावर खड्डा लक्षात येत नाही. तसेच या रस्त्यावरून जातांना वाहनधारकांचे वाहन खड्ड्यातून जातांना खड्ड्यात साचलेले पाणी जोरात उडते हे पावसाचे गढूळ पाणी या रस्त्यावरून पायदळी येणाऱ्या, जाणाऱ्या किंवा दुचाकीस्वारांच्या अंगावर उडते व यामुळे याठिकाणी दररोज लहान मोठी भांडणे व शाब्दिक चकमक होते. त्यामुळे वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेकदा या रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत असतात.

अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी सौ. शोभाताई बाविस्कर यांना दिले आहे. या निवेदनावर जितेंद्र जैन, फहीम शेख, कमलेश सुराणा, राजू वाघ, डॉ. विकास भोसले, सुनील पाटील आदींच्या सह्या असून निवेदन देतेवेळी हे सगळे उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर नवीन रस्त्यांचा डी. पी. आर. मंजुरीच्या प्रतीक्षेत असून तात्काळ भडगाव रोड परिसरातील सर्वच कॉलनी भागातील रस्ते कामाला लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या