सर्वसामान्य शिवसैनिकांपासुन ते लाॅकडाऊन आमदार पर्यंतचा राजकीय प्रवास – शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२१
सर्वसामान्य शिवसैनिकांपासुन ते शिवसेना शहरप्रमुख आणि शिवसेना शहरप्रमुख ते कोरोना काळात लाॅकडाऊन आमदार म्हणुन मिळालेली पक्षाकडुन जबाबदारी…..
अतिशय चोख व प्रखरपणे जबाबदारी सांभाळुन समाजातील सर्व वंचीत घटकांना न्याय मिळवून देण्याचा बहुमोल कार्य शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी यशस्वीपणे करून दाखवले आहे.
अनेक जणांनी पदे घेतली आणि पदे सांभाळली परंतु पद घेतल्यानंतर जी जबाबदारी पाळणे आवश्यक आहे ती जबाबदारी शहरप्रमुख म्हणुन शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी आपल्या कार्यांमधुन वेळोवेळी करून दाखवली…..
सडपातळ दिसणारा रूबाबदार दाढी असलेला व्यक्ती हा आर्थिक परीस्थिती’ने जरी प्रबळ नसला परंतु प्रबळ इच्छाशक्ती’ने भारदस्त असल्याचा व हे पाहण्याचा योग अनेकांना आला.
मागील कित्येक वर्षापासुन अविरात समाजसेवा दिवस-रात्र करत असल्याचे पाचोरेकरांनी पाहिलेले आहे.
कुठलेही आमीष न ठेवता – निस्वार्थीपणे समाजसेवा करणारे निखळ मनाचे उबदार नेतृत्व….
याकाळात संकट अनेक आलीत व आव्हाने असंख्य समोर उभी राहिलीत परंतु उद्भवलेली परिस्थिती’शी दोन हात करतांना कुठेही डावाडोल न होऊ देता आपल्या संघर्षातुन अखेर यश मिळवुन सर्वांचे मन जिंकण्याचे काम आप्पासाहेब किशोर बारवकर यांनी करून दाखवले आहे.
त्यांनी आजपर्यंत केलेले महत्त्वपुर्ण कामांवरती दृष्टीक्षेप टाकुयात….
१) कोवीड सेंटर मध्ये सर्व दुर कोरोना’ला घाबरत असतांना अशावेळी भक्कमपणे उभे राहुन रूग्णांना व रूग्णांचे नातेवाईक यांना धीर देण्याचे काम किशोर बारवकर यांनी केले.
एवढेचं नाही तर शारीकदृष्ट्या त्यांना उर्जा मिळवण्यासाठी आणि कोरोना व्हायरस विरूध्द लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी प्रोटीन’ची आवश्यकता असल्याचे जाणवल्याचे पाहुन कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः कोवीड सेंटरमध्ये जाऊन सकाळ संध्याकाळी रूग्णांना उकळलेले अंडे पुरवण्याचे कार्य केले.
२) कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील हे कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर ते पुढील उपचारासाठी मुंबई’ला महिनाभर गेले असता त्या काळात लाॅकडाऊन आमदार म्हणुन – पाचोरा शहर व तालुक्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळुन दररोज विविध विभागांमध्ये जाऊन जनतेचे अनेक प्रश्न सोडविण्याचे काम शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी केले.
३) शहरातील असो कि ग्रामीण भागातील जनतेचे विविध प्रश्न – ज्यात प्रामुख्याने आरोग्य व विजेसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीचं धडपड करतांना आपण सर्वांनी किशोर बारवकर यांना पाहिले.
कोवीड सेंटर’ची व्यवस्था व तेथील समस्या दुर करण्यासाठी वेळोवेळी भेट व पाठपुरावा करून उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचा प्रयत्न असो कि कुणाचे वाढीव बिलं कमी करण्याचे असो एवढेचं नव्हे तर वैद्यकीय कुठलेही मदत असो अथवा बेड’ची व्यवस्था असो….
लाईट बिल कमी करायचे असो , कनेक्शन कट झाल्याचे तक्रारी असो,डि.पी असो किंवा पोलीस आणि तहसिल कचेरी संदर्भातील छोटी-मोठी कामे असो…..
सर्वांच्या ओठांवर फक्त एकचं नाव – शिवसेना दबंग शहरप्रमुख किशोर बारवकर
४) अपघात असो त्यात तातडीची मदत असो…
कि रस्त्यावर लाॅकडाऊन काळात उपाशी जाणारे शेतमजुरांसाठी अन्नदानाची व्यवस्था असो….
कुणावर अन्याय झालेला असो कि कुणाला योग्य न्याय मिळालेला नसो – या सर्वांसाठी एकमेव भांडणारे व्यक्तीमत्व किशोरआप्पा बारवकर
५) प्रभागातील असो कि शहरांमधील असो गरजुंना स्व:खर्चाने लाॅकडाऊन काळात अन्नधान्य किराणा किट कुठलेही जाहिरात व प्रचार न करता अनेक कुटुंबांना छोटीसी मदत त्यांच्या परीने करणारे समाजसेवी व्यक्तीमत्व
६) रेल्वे प्रवाशांना लाॅकडाऊन काळात तासनतास पाचोरा रेल्वे प्लॅटफॉर्मवरती गाड्या थांबण्याला सामोरे जावे लागत असल्याचे पाहुन अनेकवेळा त्यांना पाणी बिस्कीट केळी अन्नदान ( खिचडी ) वाटपाचे मदतीसाठी काम किशोर बारवकर व त्यांचे सहकारी मित्र मंडळी करून माणुसकीचे दर्शन घडवले.
अज्ञात लोकांना मदतीचा हात म्हणजे देवरूपी काम या सर्वांनी केले.
कुठलाही साधा फोन मदतीसाठी आला तर तेवढ्या रात्री मुत्सद्दी ने आपल्या कार्येकर्तेंच्या फौजफाट्यासह हजर राहणारे युवानेते शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर….
७) टंचाई काळात पाण्याचे टॅंकरने पाणी घरपोच पोहचविणे असो कि नगरपालिका मधील कुठलेही अडकलेली कामे असो – फक्त एकचं नावं शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर
८) शिवसैनिकांवर केलेले खोटे गुन्हे असो ? विद्यार्थ्यांवर झालेले अन्याय असो ???
यासाठी विविध आंदोलने,मोर्चे, केंद्र सरकार विरोधात विविध विषयांसाठी रास्तारोको,निवेदने असो – पुढाकार घेणारे एकमेव नेतृत्व किशोर बारवकर…..
९) पक्षाचे विविध कार्यक्रम,भाषणे,बैठका असो किंवा सभा असो किंवा विविध जयंती व पुण्यतिथी चे कार्यक्रम असो – वर्षभर व्यवस्थितपणे मॅनेजमेंट सांभाळणारे कुशल हजरजबाबी व्यक्तीमत्व किशोर बारवकर….
१०) कुणाची तडकाफडकी बदली’ची डेरींग असो किंवा त्यांनी केलेले गैरकृत्याचे धडा शिकवण्याचे काम असो – फक्त आणि फक्त शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी वेळोवेळी करून दाखवले आहे.कुलुप ठोकायचे काम असो कि हत्तीच्या मुखात मुंगी सारखे प्रवेश करून हत्ती’ला पण तांडव करणारे हे संयमी व्यक्तीमत्व…
११) शब्द’ही व लेख अपुरे पडती एवढे कामे वर्षभरात दररोज त्यांच्या हातुन घडत असतात.दररोज कुणालाही कुठेही मदतीसाठी पोहोचणारा हा सर्वसामान्य शिवसैनिक आहे.हाक देताचं साथ देणारा हा लढवय्या आहे.
कशाचीही पर्वा न करता कार्येकर्तेंसाठी लढणारा एकमेव झुंजार नेता आहे.
*म्हणुनचं सर्वजण हक्काने म्हणतात – आमचा हक्काचा पावरफुल माणुस किशोर आप्पा बारवकर….*
जेव्हा जेव्हा पाचोरा राजकारण ग्रुप’ने मदतीसाठी विविध प्रश्न सोडविण्यासाठी हाक दिली आहे तेव्हा तेव्हा अगदी काही क्षणात पक्षकारांना साथ देण्यासाठी उभे राहुन आपली एक वेगळी ओळख मागील काळात जनमनात शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी तयार केली आहे.
*जनमनात हा ठसा उमविटणारे कमी वेळेत आपल्या कामांनी जास्त षटकार ठोकणारे – या समाजसेवी व्यक्तीमत्वाला वाढदिवसाच्या निमित्ताने पाचोरा राजकारण ग्रुप परीवार तर्फे मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा !!!*
*आई भवानी आपणास अशीच जनसेवा तुमच्या हातुन घडविण्यासाठी प्रचंड प्रचंड शक्ती देओ व तुमचे व तुमच्या कुटुंबांचे आरोग्य नेहमीच सदृढ राहावे हिच प्रार्थना….*
*शुभेच्छूक*(अजय जैस्वाल.) पाचोरा राजकारण ग्रुप परीवार*