नगरदेवळा येथिल पत्रकारांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेत प्रवेश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०७/२०२१
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील पत्रकारांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कार्याची दखल घेऊन नुकताच संघटनेत नुकताच प्रवेश केला.
नगरदेवळा येथिल शाहीर कलादालन कार्यालयात नुकत्याच झालाल्या बैठकीत पत्रकार संघटनेच्या खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला यावेळी प्रकाश एस.जगताप,दै.देशदुत,मिलींद जगन्नाथ दुसाने,जनशक्ती,अशोक रामदास भामरे,दै.दिव्यमराठी, शैलेंद्र बिरारी ,दै.सकाळ, सौरभ तोष्णीवाल,दै.पुण्यनगरी, दिपक (सोनू) परदेशी, दै.सामना, जितेंद्र परदेशी, दै.तरूण भारत, संजय सोनार, दै.लोकमत, फारूख शेख, पोलीस टुडे, अलीरजाख गुलशरखा, साप्ताहीक संपादक यांनी प्रवेश घेतला.
प्रवेश घेतलेल्या पत्रकार बांधवाना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या नावाची मानचिन्ह असलेल्या शॉल देऊन प्रवेश देण्यात आला.
यावेळी संघटनेचे सल्लागार अनिल आबा येवले शहरप्रमुख, हेमंत विसपुते माजी ग्रामिण जिल्हाध्यक्ष, राजेंद्र शिंपी माजी ग्रामिण जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती होती.
दरम्यान पत्रकार जितेंद्र परदेशी यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणुन यावेळी नियुक्ती करण्यात आली. या प्रवेश सोहळ्या प्रसंगी हेमंत विसपुते यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे ध्येय,धोरण कार्यपद्धती विषयी माहिती दिली.