रस्त्यावर चूल पेटवून भाजल्या भाकरी,गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस महिलांचे आंदोलन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१२/२०२०
पाचोरा येथे केंद्रसरकारने केलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात पाचोरा-भडगांव राष्ट्रवादी महिला काँग्रेसने राजे संभाजी महाराज चौकात रस्तावर चूल पेटवून भाकरी भाजून आंदोलन करत गॅसची दरवाढ कमी करण्यासंदर्भात केंद्रसरकारचे लक्ष वेधले.गटनेत्या नगरसेविका सूचेताताई वाघ,राष्ट्रवादी महिला क्षेत्रप्रमुख़ ज्योतीताई वाघ,पाचोरा महिलाध्यक्षा सरलाताई पाटील,भडगांव महिलाध्यक्षा नगरसेविका योजनाताई पाटील,प्रा.मंगलाताई शिंदे,शहराध्यक्षा जयश्रीताई मिस्तरी,शहराध्यक्षा रेखाताई पाटील,सुरेखाताई पाटील,प्रा.सुनिताताई मांडोळे,सुनिताताई वारुळे,प्रतिभाताई पाटील,संध्याताई बोरसे आदि महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Download WordPress Themes Nulled and plugins.