राज्याचे विरोधी पक्षनेते मा. श्री. अजितदादा पवार १५ तारखेला जिल्हा दौऱ्यावर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०९/२०२२

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते ना. मा. श्री. अजित पवार हे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर प्रथमच जळगांव जिल्ह्याचा दौरा करत असून या दौऱ्याची सुरवात पाचोरा येथून होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष अँड रविंद्र भैय्या पाटील यांनी माजी आमदार दिलीप वाघ याचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, भडगाव येथील शाम भोसले, हर्षल पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, रणजित पाटील उपस्थित होते, पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी अँड रविंद्र पाटील, दिलीप वाघ, नितीन तावडे, संजय वाघ,शाम भोसले, शहराध्यक्ष अजहर खान यांचे उपस्थितीत भडगाव रोडवरील महालपूरे मंगल कार्यालयात पाचोरा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.

विरोधी पक्षनेते ना. मा. श्री. अजितदादा पवार यांचा दौरा १६ तारखेला आयोजित करण्यात आला होता मात्र त्यात बदल होऊन ना. पवार दिनांक १५ सप्टेंबर २०२२ गुरुवार रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते मुंबईहून औरंगाबाद येथे विमानाने आल्यानंतर औरंगाबाद येथून कन्नड हुन चाळीसगाव मार्गे पाचोरा येथे १०.०० वाजता खाजगी वाहनाने आल्यानंतर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. संजय वाघ यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. १०.३० वाजता श्री. गो. से. हायस्कूलमध्ये जिजाई रंगमंचचे उद्घाटन माजी मंत्री मा. श्री. एकनाथराव खडसे तर पाचोरा महाविद्यालयातील नव्याने बांधलेल्या वाय. सी. एम. इमारतीचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

या दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी सभापती मा. श्री. अरुणभाई गुजराती हे असतील. त्या नंतर दुपारी एक वाजता पाचोरा महाविद्यालयात पाचोरा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, माजी खासदार वसंतराव मोरे,हमाजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीष पाटील, जिल्हाध्यक्ष अँड. रविंद्र भैय्या पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार राजीव देशमुख,मनिष जैन,अरुण पाटील, संतोष चौधरी, दिलीप सोनवणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, संजयदादा गरूड, एजाज गफ्फार मलीक, विलास पाटील, रविंद्र नाना पाटील, अरविंद मानकरी, योगेश देसले, संतोष चव्हाण, माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ संजय वाघ सह पाचोरा भडगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला उपस्थित राहतील.

यावेळी अँड रविंद्र पाटील यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की यापुढील सर्व निवडणुका भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांना वगळून सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढविल्या जातील.

ब्रेकिंग बातम्या