भाजप-शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, विकास पाटील नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे आवाहन.
दिलीप जैन(पाचोरा)
दिनांक~१७/०३/२०२२
भाजप-शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन विकास पाटील नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केले आहे. कारण सध्या भविष्यातील निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने पाचोरा शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळी आंदोलने होत आहेत. मात्र दुर्दैवाने ही सर्व आंदोलने जनतेसाठी न होता केवळ दिखाऊपणा व एकमेकांची खरडपट्टी काढण्यासाठी शिवराळ भाषेत होत असल्याचे दिसते.
यात भाजप नेते व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नंतर शिवसेना नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते असा सामना बघायला मिळत आहे. अत्यंत खालच्या पातळीत नेते व पदाधिकारी यात बोलतांंना दिसत आहेत. मुळात आपल्या पाचोरा तालुक्याची संस्कृती व संस्कार हे शांतता, संयम,व विकासासाठी राजकारण करणाऱ्या कै. बापूसाहेब के.एम.पाटील तसेच कै. आप्पासाहेब ओंकार वाघ, कै. तात्यासाहेब आर.ओ. पाटील, कै.आण्णासाहेब सुपडू भादू पाटील. यांच्या वारसा आपण आजही अभिमानाने सांगत असतो. आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने व नेत्यांनी जनआंदोलन करतांना. हे सरकारच्या विरुद्ध करून तालुक्यातील शासकीय अधिकारी कसे धाकात राहतील व जनतेची कामे करतील असेच काम केले आहेत.
मात्र आज सर्व तालुक्यातील जनता या दोघात सुरु असलेला तमाशा उघड्या डोळ्यांनी बघतांना दिसत आहेत. दोष कुणाचा सुरुवात कोणी केली हे बघण्यापेक्षा जनतेचे प्रश्न योग्य वेळी सोडवणे हे महत्त्वाचे आहे. या अश्या राजकीय वादामुळे मूळ प्रश्न बाजूला राहत असून,
तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी जनतेच्या कामापेक्षा इतर सर्व कामामध्ये सहभागी होतांना दिसत आहे.
राजकीय नेत्यांच्या पदाधिकाऱ्याचा तालुक्यातील वचक संपण्याच्या मार्गावर आहे. अश्या पद्धतीने राजकारण करून आपण काय मिळवणार आहोत. याचेही आत्मपरीक्षण आपण करणे गरजेचे आहे. आणि विशेष म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना लोकांनी निवडून दिले ते लोक सुध्दा. कसे बोलतात हे जनता बघत आहे. आपला पक्ष त्याची विचारधारा काय आहे हे सांगणे गरजेचे आहे. प्रश्न, समस्या, आंदोलने जनतेसाठी अत्यावश्यक आहे. पण त्या सगळ्याचा वापर सरकारी यंत्रणा वर वचक निर्माण करून जनतेच्या कामांसाठी व्हावा अस माझे व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्पष्ट मत आहे.
जनतेचे असंख्य प्रश्न असतांना आपण आपल्या तालुक्यात कोणती राजकीय संस्कृती रुजवत आहोत, आपल्या मोर्चे, आंदोलनात सामिल असलेले तरुण कार्यकर्ते यांच्यावर याचे काय दुष्परिणाम होतील, तसेच बऱ्याचशा मोर्चे, आंदोलनात मात, भगिनी सामील असतात याचे भान ठेवून दोघे राजकीय पक्ष नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. आपण कोणता राजकीय वारसा घेऊन चालणार आहोत. राडा ही आपल्या तालुक्यातील राजकीय संस्कृती मुळीच नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी शिंगाडे मोर्चा हीच आपली खरी संस्कृती आहे.
पण ती ही कोणत्या राजकीय पक्षाच्या विरोधात नसून सरकारी धोरणाच्या विरोधात आहे. तसेच शांतपणे या तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे धरण, जलसाठे ,वाढवणे ही आपली ओळख आहे. पाचोरा तालुक्याची ओळख ही सर्वात जास्त जलसिंचन प्रकल्प, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ, निर्मल सिड्स, नवीन बस स्थानक, रेल्वे स्टेशन, खत कारखाना, नवीन शैक्षणिक प्रकल्प, आणि सुसंस्कृत कष्टकरी माणूस हीच आहे आणि असावी. येणाऱ्या काळात आपल्या तालुक्यातील जनतेसाठी मोठे औद्योगिक प्रकल्प, शेतीसाठी पाणी, युवकांना रोजगार, महिलांना रोजगार. हे जिव्हाळ्याचे प्रश्न असतांना आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
विकास कामाचे राजकरण झाले पाहिजे हे नक्की परंतु हे करत असतांना आपण किती शिव्या देतो किती खालच्या पातळीवर बोलतो याचे याचे राजकारण व्हायला नको. जनतेचे प्रश्न,समस्या समजून त्या सोडवण्यासाठी राजकारण करावं विधायक,विकासासाठी एकत्र बसावं, जनतेच्या प्रश्नांवर लढावं आपल्या समोर आपल्या तालुक्यासमोर जनतेसमोर अनेक प्रश्न असून आपण ते सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे. माझे या दोघा पक्षांना नेत्यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन आहे.
त्यांनी संयम ठेवावा. तालुक्यात व शहरात वातावरणात खराब होऊ नये अश्या पद्ध्तीने वागावे, बोलावे. विकासासाठी राजकारण करावे. शांतता, संयम, ठेवावा. जनता सर्व बघत आहे. तालुक्यातील पुढील पिढ्याना आपण काय विचार वारसा देणार आहोत. राजकारण चांगलं की वाईट. हे जनतेच्या मनात निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे. असो! माझं भाजप-शिवसेनेच्या नेते ,पदाधिकारी व कार्यकर्त्याना नम्र विनंती आहे. शांतता, संयम ठेवावा. असे आवाहन
विकास पाटील. नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पाचोरा. यांनी केले आहे.
या निमित्ताने सत्यजित न्यूज कडून दोन शब्द.
(आजपर्यंत पाचोरा शहरात सांस्कृतीक कार्यक्रम, स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिवस, सण, उत्सव, जयंती किंवा जनहितार्थ मोर्चे आंदोलने याची सुरवात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून होते परंतु प्रत्येक कार्यक्रमाची सुरवात होण्याआधी संबंधित कार्यकर्ते, राजकारणी, समाजसेवक हे सगळ्यात अगोदर ज्यांनी स्वराज स्थापन केले ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज व ज्यांनी सुराज्य येण्यासाठी आपली राज्यघटना लिहिली ते युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मगच कार्यक्रमाला सुरुवात करतात.
मात्र दुसरीकडे आपल्या जिवनात जगतांना, वागतांना मात्र या युगपुरुष व त्यागमूर्ती यांनी दिलेली शिकवण आचरणात न आणता आपली संस्कृती सोडून वागतात यातूनच या संबंधितांचे वैचारिक वाभाडे निघतात. जर या राजकारणी लोकांनी खरंच आमच्या राज्यांना व आमच्या बाबासाहेबांना ओळखले असेते, त्यांना वाचले असते, त्यांना समजून घेतले असेते तर नक्कीच त्यांच्याकडून अशी चूक होणे कदापि शक्य नाही. परंतु या महापुरुषांचा फक्त आणी फक्त राजकारणा पुरता वापर करून स्वतः पोळ्या भाजून घेण्यासाठी हा देखावा आहे का ? असा मोठा प्रश्न यांच्या बोलण्या व वागण्यावरुन निर्माण होतो.)