ज्ञानेश्वर सोनार व असंख्य कार्यकर्त्यांचा आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे तसेच पंचायत समिती सदस्य मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार यांनी वैयक्तिक कारण दाखवत शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत पंचायत समिती सदस्य पदाचाही राजीनामा दिला होता. या अचानकपणे दिलेल्या राजीनाम्याने वरखेडी परिसरात एकच खळबळ उडाली असून आज मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार यांनी आपल्या सोबत बरेचसे कार्यकर्ते घेत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.
पाचोरा तालुक्यातील शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार (कुऱ्हाड गण) यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजप मध्ये केला प्रवेश.
शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांनी नुकताच शिवसेनेचा पदाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष अमोल भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा नेते माजी मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.