आनंद शिंदे महाराष्ट्राचे महागायक,माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी दिली ज्येष्ठ विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१२/२०२०
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक निवेदक आणि रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तानाजी कांबळे
रा. सिंधुदुगँ जिल्हा यांचा चिरंजीव, उपासक वैभव आणि विनोद कोल्हे रा. अकोला जिल्हा यांची कन्या उपासिका वैष्णवी यांचा मंगल परिणय सोहळा दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी मुंबईतील कांजूर मार्ग आर के हॉल येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
२३ डिसेंबर २०२० रोजी सायं. ७ वाजता महाराष्ट्राचे लोकप्रिय गीतकार, संगीतकार,महागायक आनंद शिंदे आणि माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांच्या चांदिवली संघर्ष नगर येथील निवास स्थानी भेट देऊन उपासक वैभव, उपासिका (वैष्णवी) मंगल परिणया नंतर वैशाली या नवदांपत्यास महागायक आनंद शिंदे आणि माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन मंगल परिणयाच्या व उज्वल वैवाहिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांनी महागायक आनंद शिंदे आणि माजी नगरसेवक रमेश कांबळे यांचा शाल देऊन तसेच विश्वरत्न, भारतरत्न, महामानव,बोधीसत्व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन महागायक आनंद शिंदे, आणि नगरसेवक रमेश कांबळे यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार केला.
ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या निमित्त केलेल्या स्नेह भोजनाचा महागायक आनंद शिंदे आणि माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी पाहुणचार घेतला.
चांदिवली संघर्ष नगर च्या वतीने या वेळी महागायक आनंद शिंदे यांचा ज्येष्ठ विद्रोही पत्रकार ताज्जुब कांबळे, ज्येष्ठ नेते प्रकाश दाहिजे,उत्तम भगत, श्याम भाऊ कांबळे ,निवृत्ती हिवाळे, दादाराव वाघमारे, अश्विन कांबळे, अजय गायकवाड,नेहल नेटवटे, सूरज मोकल. यांनी ही महागायक आनंद शिंदे आणि माजी नगरसेवक रमेश कांबळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
महामानव, बोधिसत्व,डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बुद्ध धम्मास अनुसरुण आणि 22 प्रतिज्ञांचे पालन वाटचाल करणा-या तानाजी कांबळे आणि त्यांच्या कुटुंबाला महागायक आनंद दादा शिंदे आणि माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी त्यांच्या उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महा गायक आनंद शिंदे,माजी नगरसेवक रमेश कांबळे यांचे पंचारती ओवाळून उपासिका आरती कांबळे, वैशाली वैभव कांबळे, समृद्धी कांबळे, संध्या भगत, सुरेखा कणसे, आदी महिलांनी स्वागत केले.
आपल्या मुलाच्या मंगल परिणयाच्या निमित्ताने आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या घरी भेट दिल्याबद्दल आपल्या परिवाराच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे, आरती तानाजी कांबळे, वैभव तानाजी कांबळे, वैशाली वैभव कांबळे अभिषेक तानाजी कांबळे समृद्धी तानाजी कांबळे यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
लेखक : उत्तम भगत
मंगल परिणयाच्या निमित्त दिल्या वैभव वैशाली नवदांपत्यास मंगलमय शुभेच्छा!