प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने देगलूरचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक श्री.भगवानराव धबडगे यांचा कोविड योद्धाने सन्मान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०६/२०२१
देगलूर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष तथा पत्रकार मिलिंद कावळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तालुका देगलूर यांच्या वतीने देगलूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा.भगवानराव धबडगे यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या दिड वर्षापासून कोरोनाचा खूप मोठा प्रसार वाढत होता अशा काळात त्यांनी दिवस रात्र जागे राहून जनतेची सेवा केली.अशा या महाभयंकर कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन जनतेची सेवा केली. यांच्या या उत्तम कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देगलूर व नांदेड जिल्ह्यातील सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
याचाच एक भाग म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तालुका देगलूरचे तालुकाध्यक्ष मिलिंद कावळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.डी. टी.आंबेगावे यांच्या सूचनेनुसार व नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा संघटक मा.विशाल पवार, प्रेस संपादक सेवा संघ देगलूर तालुका अध्यक्ष मा.मिलिंद कावळगावकर, शहरध्यक्ष मा नाझीम शहा, दै.तरुण भारत ता.प्रतिनिधी मा.अस्लम शेख, दै.न्याय टाईम्स ता.प्रतिनिधी मा.भीमराव दिपके ,दै. कुलस्वामिनी ता.प्रतिनिधी मा.हबीब रहिमान, दै.वतनवाला ता.प्रतिनिधी मा.साई कावटवार, दै.पुढारीचे मा.वसीम शहापूरकर,दावणगिर सरपंच प्रतिनिधी मा.संदीप दावणगिरकर, सामाजिक कार्यकर्ते मा.संदीप पांढरे सर्व पत्रकार बंधू व मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.