प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा जीवन गौरव पुरस्कारांने सन्मान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२१
भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव मुरारी भांबोरे यांना जीवन वेलफेअर फाऊंडेशन व मिडिया पार्जटनर जटा टीव्हीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह नागपूर येथे कोरोना व लाॅकडाऊनच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन जीवन वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल राऊत व जनता टाइम्सचे संपादक निखिलेश कांबळे यांच्या हस्ते दुसऱ्या वर्धापनदिना निमित्त जीवन गौरव पुरस्कार व कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे होते. संजीव भांबोरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, क्राईम विभागाध्यक्ष नफीस शेख, चित्रपट विभागाध्यक्ष प्रशांत विलणकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, किरण बाथम, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा महिलाध्यक्षा किरण जाधव, विदर्भ अध्यक्ष विजय बुंदेला, महिलाध्यक्षा सविता चंद्रे, कोकण विभागाध्यक्ष जयप्रकाश पवार, महिलाध्यक्षा ज्योती चिंदरकर, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, उत्तर महाराष्ट्र विभागाध्यक्ष नवनाथ गायकर, संपर्क प्रमुख युवराज देवरे, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत पोरे, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व सभासदांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.