ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध निवडून येणाऱ्या प्रत्येक सदस्याला गाव विकासासाठी तीन लाख रुपये देणार.(आमदार किशोर पाटील.)
दिलीप जैन.(पाचोरा)
२०/१२/२०२०
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असुन शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंञी यांनी संपुर्ण राज्यातिल ग्रामपंचायत निवडणुका ह्या महाविकास आघाडिच्या माध्यमातुन लढाव्यात माञ भारतिय जनता पक्षाशी हातमिळवणी करून निवडणुक लढउ नये असे आदेश दिले असुन पाचोरा— भडगाव विधानसभा मतदार संघातिल सर्व ग्रामपंचायतिनी आपली ग्रामपंचायत ही बिनविरोध करून गाव विकास करून घ्यावा.या निवडणुकित बिनविरोध निवडुन येणाऱ्या प्रती सदस्यास तिन लक्ष रूपयांचा विकास नीधी उपलब्ध करून देणार असल्याची माहीती आमदार किशोर पाटील यांनी पञकार परिषदेमध्ये दिली.
शिवालय शिवसेना कार्यालयात आज आमदार किशोर पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली पञकार परिषद घेण्यात आली यावेळी उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटिल,गणेश पाटिल,अॅड.दिनकर देवरे, जि.प. सदस्य रावसाहेब पाटिल,संजय पाटिल,दिपकसिंग पाटिल, भडगाव माजी सभापती विकास पाटिल,जे.के.पाटिल,ज्ञानेश्वर पाटील,रामकृष्ण पाटिल,डाॅ.विलास पाटिल,जालंदर चित्ते,डाॅ.भरत पाटिल,अरूण पाटिल,किशोर बारावकर व स्विय्य सहाय्यक राजु पाटिल आदी उपस्थीत होते.यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटिल म्हणाले की, सध्या संपुर्ण महाराष्टात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे.नुकतिच विधान परिषदेची निवडणुक झाली.यात परंपरागत भाजपाला पसंती देणार्या सुशिक्षित मतदारांनी नाकारून महाविकास आघाडिला घवघवित यश दिले.केंद्राच्या शेतकरी विरोधी कायद्या विरूध्द संपुर्ण देशातिल शेतकरी एकवटुन रस्त्यावर आला आहे.या शेतकरी आंदोलनावर भाजपाचा कुठलाही नेता तोडगा काढण्यास पुढे आलेला नाही.करोना या महामारीमुळे समाजातिल सर्वच स्थर हे बेजार झाले असुन देशासह राज्यातुन भाजपाला हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे.या ग्रामपंचायत निवडणुकित मतदार संघाचा विधानसभा सदस्य या नात्याने मी जनतेला जाहिर अवाहन करतो की,त्यांनी गाव विकासाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपली ग्रामपंचायत बिनविरोध करावी.मतदार संघातिल काही ग्रामपंचायती ह्या ७ सदस्य, ९ सदस्य ते ११ व १७ अशा सदस्यांच्या आहेत.अशात प्रत्येक ग्रामपंचायत हा विषय न घेता प्रती बिनविरोध सदस्य असा निकष धरून तिन लक्ष रूपयांचा विकास नीधी आमदार या नात्याने मी उपलब्ध करून देणार आहे.तरी या निवडणुकित जास्तित जास्त ग्रामपंचायती व सदस्य हे बिनविरोध करून गावाच्या विकासाची स्वप्न पुर्ण करावी असे अवाहन त्यांनी यावेळी केले .