मा.आमदार श्री. किशोरआप्पा पाटील. यांच्या उपस्थितीत अंबे वडगाव ते कुऱ्हाड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव ते कुऱ्हाड रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासन जिल्हापरीषद बांधकाम विभाग जळगाव यांच्या माध्यमातून जिल्हापरिषद सदस्य सौ.रेखाताई दिपकसिंग राजपूत.निधीतून अठरालाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या कामाचा शुभारंभ दिनांक २९ नोव्हेंबर रविवारी मा.आमदार श्री. किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच हस्ते फीत कापून शिवसेनेचे मा.श्री. अरुण पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी माजी जिल्हापरिषद सदस्य दिपकसिंग राजपूत, गणेश पाटील, राजुदादा पाटील, हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
या रस्त्याचे डांबरीकरण होत असल्याने या गावशिवारातील शेतकऱ्यांची अडचण दुर होणार असून जळगाव जाण्यासाठी हा कमी अंतराचा रस्ता झाल्याने पंचक्रोशीतील जनतेला याचा फायदा होणार असल्याचे मत अॅड. मंगेश गायकवाड यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी विनायक शळके, मंगेश गायकवाड, उपसरपंच सौ. हमीदाबाई तडवी, सौ.सरलाबाई निकम, मच्छिंद्र थोरात, अमरसिंग पवार, प्रदिप सानप, ग्रामसेवक नारायन सोनवणे, बालू चंद्रे, सजय देवरे, शशिकांत वाघ, मंगेश खैरनार, भोलाभाऊ शळके आण्णा चव्हाण, कैलास निकम, नाना शिंदे, राजेंद्र भुसारे, गजानन चंद्रे व असंख्य ग्रामस्थ हजार होते.
कार्यक्रमाचे सुरवातीला सेनिटायझर व मास्क देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.