दिपावलीच्या खरेदीसाठी नेरी येथील अरिहंत जनरल स्टोअर्समध्ये ग्राहकांची एकच झुंबड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१०/२०२२
दिपावली म्हटलं म्हणजे हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा सण हा उत्सव साजरा करण्यासाठी गोरगरीब तसेच सर्व स्तरातील लोक हा उत्सव साजरा करतात. या सणानिमित्त नवनवीन कपडे, चैनीच्या वस्तू, दाग, दागिने सोबत घर सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू व महत्वाची खरेदी असते ती गोडधोड पक्वान्न, मिठाई, शेव, चिवडा व ईतर फरसाण, नविन वाहन खरेदीकडे मोठ्या प्रमाणात कल असतो मग अश्या सण, उत्सवानिमित्त खरेदी करतांना आपली फसगत होऊ नये म्हणून आपण विश्वसनीय ठिकाणी खरेदी करण्यासाठी जात असतो व अशी दुकाने ठराविक असतात.
तसेच मागील वर्षी कोरोनाच्या काळात कडकडीत लॉकडाऊन असल्याकारणाने इच्छा असूनही आपल्याला सण, उत्सव साजरे करता आले नाहीत. म्हणून यावर्षी सण, उत्सव साजरे करतांना बाजारात खरेदीसाठी कमालीचा उत्साह दिसून येत आहे. याच उत्साहात आपली लुट होऊ नये म्हणून जामनेर तालुक्यातील नेरी येथील मा. श्री. गौतम शांतीलाल जैन यांनी आपल्या ग्राहकांसाठी अरिहंत जनरल स्टोअर्सच्या माध्यमातून गृहसजावटीचे साहित्य, रंगीबेरंगी आकाशकंदील फटाके, घरावर रोषणाई करण्यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रीक लाईटच्या माळा, इलेक्ट्रॉनिक आकाश कंदील, वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळ्या, वेगवेगळे रंगाचे गृह सजावटीसाठी लागणारे साहित्य व इतर चांगल्या प्रतिच्या (क्वालिटीच्या) वस्तू अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या आहेत.
विशेष म्हणजे या वस्तू उपलब्ध करून देतांना आर्थिक फायदा न पहाता आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांचा अतुट विश्वास कायमस्वरूपी टिकुन रहावा यासाठी गौतम जैन यांनी चायनीज वस्तूंची विक्री टाळुन स्वदेशी बनावटीच्या वस्तू व साहित्य अल्पदरात उपलब्ध करून दिले आहे.