मालखेडा येथील सी.सी.आय.कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरची मनमानी. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२०
जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील केशरी अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या जिनिंगमध्ये सी.सी..आय.कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून या कापूस खरेदी केंद्रावर कापूस उत्पादक शेतकऱ्याला चोरासारखी वागणूक मिळत असून ग्रेडरचा मनमानी कारभार सुरु असल्याचे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी मांडले आहे.
या बाबतीत कोल्हे येथील आदर्श शेतकरी श्री. रमेशजी बाफणा व इतर शेतकऱ्यांनी या कापूस खरेदी केंद्रावर सुरु असलेला गैरप्रकार सांगितला
यात चक्क या ठिकाणी नियुक्त ग्रेडर हे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून न घेता तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी धमकी देतात असे कापूस उत्पादक शेतकरी सांगतात.
(*सविस्तर वृत्त वाचा उद्या संबंधित कापूस खरेदी केंद्रावर शेतकरी व बैलजोडी करीता कोणत्याही सुविधा नाहीत.
तसे जिनिंगमध्ये खरेदी केलेला कापूस सुरक्षित रहावा म्हणून शासनाच्या नियमाप्रमाणे फायर फायटर व पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसून आलेले नाही.
शेतकऱ्यांनी केलेले आरोप या बद्दल ग्रेडर यांच्याकडे खुलासा मागितला असता वरिष्ठांनी आम्हाला प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती देऊनये अश्या सुचना असल्याचे सांगत कापूस खरेदी केंद्राबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा खुलासा दिला नाही.
तसेच या जिनिंगमध्ये व्यापारी व ग्रेडरची मिलीभगत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
(सविस्तर बातमी उद्या)