ब्रेक द चेन (लॉकडाऊनच्या) कालावधीतही वरखेडी येथे भरतोय बकरी बाजार.ग्रामपंचायत व तलाठी यांनी लक्ष देण्याची गरज.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०५/२०२१
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सर्वदूर आठवडे बाजार बंद करण्यात आले असल्यावरही वरखेड येथील गुरांच्या बाजारा समोर एका शेतात शेळ्यांचा बाजार भरलेला असतो. हा बाजार दर गुरुवारी भरण्यात येतो. या ठिकाणी आसपासच्या जवळपास चाळीस खेड्यातील लोक तसेच चार तालुक्यातील व्यापारी शेळ्यांची खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात. या कारणास्तव या अनधिकृत भरणाऱ्या शेळीच्या बाजारात सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडत असून शासनाच्या आदेशाला न जुमानता भरणारा या बाजाराच्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
कारण की एका बाजूला किराणा दुकान कापड दुकान भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नियमांचे काटेकोरपणे पालन करून शासनाचा आदेश पाळत आहेत मात्र दुसरीकडे गुरांचा बाजार अवैध धंदे अवैध दारू विक्री हे व्यवसाय समाजाच्या हिशोबाने घातक असूनही रात्रंदिवस चोवीस तास सुरू आहेत. तर दुसरीकडे दुचाकीस्वार चार चाकी स्वार यांना हेल्मेट नसणे तोंडाला मास नसणे तसेच सीट बेल्ट नसणे एकाच गाडीवर दोन किंवा तीन व्यक्ती बसवणे यासाठी दंड आकारण्यात येत असतांनाच दुसरीकडे मात्र नियम मोडणार यांची चांदी होत आहे. म्हणून कायदा सगळ्यांसाठी सारखा राबविण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.