वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत, नम्रता ग्रामविकास पॅनल व परिवर्तन पॅनल मध्ये सरळ लढत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/११/२०२३
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असून या ग्रामपंचायतीमध्ये वडगाव जोगे व कोकडी तांडा या तांडा वस्तीचा समावेश असून या गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकी करिता उद्या दिनांक ०५ नोव्हेंबर २०२३ रविवार रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नम्रता ग्रामविकास पॅनल व परिवर्तन पॅनल मध्ये सरळ, सरळ लढत असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
या निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांचे खंदे समर्थक संजय देवरे यांच्या सोबत माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचे कार्यकर्ते यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून व अमोल भाऊ शिंदे यांचे खंदे समर्थक मुकेश पाटील यांनी नम्रता ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. मागील तीन दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली तेव्हापासून दोघेही पॅनलचे उमेदवार घराघरात, दारादारात जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत. यामुळे या निवडणुका कळात हौश्या, नौश्याचाही भाव वधारला असल्याचे दिसून येते.
सद्यस्थितीत कोणत्याही निवडणुकीत उमेदवार हे आपल्याकडे मते मिळवून घेण्यासाठी काम, दाम, दंड, भेद या सर्व युक्तींचा व शक्तींचा वापर करतांना दिसून येतात असाच काहीसा प्रकार या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिसून येते आहे. तसेच मते वळवून घेण्यासाठी ओल्या पार्ट्यांना उत आला असल्याचे तसेच हात ओले केले जात असल्याने या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडत असून दारुचा महापूर आला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून उद्या मतदान घेण्यात येणार असल्याने आजचा दिवस व आजची रात्र दोघेही पॅनलचे उमेदवार कंबर कसून प्रचाराला लागले आहेत.
परिवर्तन पॅनल.
नम्रता पॅनल.