श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे आमदार डॉ.सुधीर तांबे यांची भेट.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०९/२०२२
काल दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजी आमदार डॉ. सुधीर तांबे साहेबांनी श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन नानासाहेब मा. श्री. संजय वाघ यांच्या हस्ते डॉ. सुधीर तांबे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच सौ.पी.एम. वाघ मॅडम यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल
तर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. वले सर व सौ. उदावंत मॅडम यांचा श्री.तांबे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब श्री. व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन दादासाहेब श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासाहेब श्री. वासुदेव महाजन, एम. एम. महाविद्यालया प्र. प्राचार्य डॉ. वासुदेव वले, भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एम. गायकवाड सर, मुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ मॅडम, संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आमदार तांबे साहेबानी शिक्षक, शाळा व संस्था चालकांच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.एल.पाटील सर व आभार प्रदर्शन श्री.ए.बी.अहिरे सर यांनी केले.