शरद पवारांवर ‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्रक्रिया शस्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेनां पाहताच विचारलं असं की सारेच झाले थक्क…
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०३/२०२१
शरद पवारांची प्रकृती अस्वस्थची बातमी कळताच उद्धव ठाकरेंसह अनेकांनी फोन करुन केली विचारपूस…
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर रात्री उशिरा यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. प्रकृती सुधारत असून आता प्रकृती स्थिर आहे. यावेळी शस्त्रक्रिया करणारे ब्रिच कँडी हॉस्पिटल चे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सर्व टीम चे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले.
यावेळी सर्वाना थक्क करणारी बाब म्हणजे शस्त्रक्रियेनंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे,आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहित पवार यांनी भेट घेतली. यावेळी टोपे यांना पाहून शरद पवार यांनी त्यांच्याकडून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली,रुग्णालयात दाखल असतांनाही शरद पवार यांनी राज्याच्या कोरोना परिस्थितीची माहिती विचारल्याने सर्वच थक्क झाले.
याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो.