ग्रामपंचायत गोराडखेडा बु येथील आठ जागा बिनविरोध : एका जागेसाठी सरळ लढत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ९ जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्या असून एका जागेसाठी लढत रंगणार आहे. वार्ड क्रं. १ मधील सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी माजी सरपंच कल्पनाबाई सुधीर पाटील व वंदनाबाई यादवराव पाटील यांच्यात लढत होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिनविरोध निघालेल्या जागांपैकी वार्ड क्रं. १ मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गातून राजेंद्र प्रल्हाद पवार व सर्वसाधारण जागेतून मनोज रामदास पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे. वार्ड क्रं. २ मधून अनुसूचित महिला राखीव जागेतून हिराबाई सुभाष मोरे, सर्वसाधारण महिला राखीव जागेतुन पुष्पा निलेश पाटील व सर्वसाधारण जागेवर गोपाल हिलाल पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तसेच वार्ड क्रं. ३ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी विजय गोपीचंद पाटील, नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला राखीव जागेसाठी ज्योतीबाई जनार्दन पाटील व सर्वसाधारण महिला राखीव राखीव जागेसाठी शकीलाबी शेख मुनाफ यांची बिनविरोध निवड झालेली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणेकामी गावातील सुज्ञ राजकीय व्यक्तींनी पुढाकार घेत नवीन होतकरू चेहऱ्यांना संधी देत स्वतः थांबण्याचा निर्णय घेऊन बिनविरोध करणेकामी प्रयत्न केला. बिनविरोध झालेल्या सर्व सदस्यांचे खासदार रक्षा खडसे, जामनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार गिरीश महाजन, पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, पं. स. सदस्य बन्सिलाल पाटील यांच्यासह गावातील नागरिकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.