पाचोरा नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाची अतिवृष्टीने बाधीत झालेल्या भागात भेट.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०७/२०२२
पाचोरा शहरात दिनांक ०८ जूलै २०२२ शुक्रवार रोजी संध्याकाळी संततधार तीन तास झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने शहरातील भिम नगर, जनता वसाहत, नागसेन नगर, हनुमान नगर, वाल्मिकी कॉलनी या भागात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन नागरीकांच्या घरात, दुकानात मोठया प्रमाणात पाणी शिरल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला तसेच काही घरांची पडझड होऊन संसारपयोगी वस्तूंची नासधूस झाली होती.
ही माहिती मिळताच पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी दिनांक ०९ जूलै शनिवार रोजी सकाळी पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभाताई बाविस्कर, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, कंत्राटदार मनोज पाटील, बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, मधुकर सुर्यवंशी, उद्योजक मुकुंद आण्णा बिल्धिकर, प्रविणजी ब्राम्हणे तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी, आरोग्य विभागाचे मुकादम, कर्मचारी यांना सोबत घेऊन भिम नगर, जनता वसाहत, नागसेन नगर, हनुमान नगर, वाल्मिकी कॉलनी या प्रभावीत विभागात भेट देऊन पाहणी केली.
या पाहणी दरम्यान नागरिकांच्या अडिअडचणी समजून घेत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व पाणी वाहून जाण्यासाठी प्रभावीत भागात जलदगतीने व त्वरित नाले व गटारी बांधण्याबाबत संकुचीत केले असता मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभाताई बाविस्कर यांनी बांधकाम अभियंता यांना आदेशीत करत प्रभावीत भागातील गटारी व नाल्यांचा प्रलंबित विषय त्वरित मार्गी लावण्यासाठी सूचना देऊन आहे गटारी व नालेसफाई करण्यासाठी कामाला सुरुवात करत तुमच्या सर्व समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांनी समाधान मानले.
यावेळी नगरपालिका कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.