तालुकानिहाय भांडी वाटप करण्यात येणार, भडगाव येथे गर्दी करु नये.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०२/२०२४
केंद्र सरकारकडून कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रोजगारांना भडगाव येथे भांडी वाटप करण्यात येत आहेत. भडगाव येथे एकाच ठिकाणी सहा तालुक्यातील रोजगारांना भांडी वाटपासाठी आयोजन करण्यात आले होते. ही भांडी वाटप करण्यासाठी तालुकानिहाय तशा सुचना देऊन ठराविक संखेत कुपन वाटप करुन भांडी वाटप करण्यात येणार होते परंतु काही लोकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे सहा तालुक्यातील हजारो महिला व पुरुष लाभार्थ्यांनी भांडी वाटपाच्या ठिकाणी एकच गर्दी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता याची दखल घेत सत्यजित न्यूज कडून थेट भडगाव येथे जाऊन भांडी वाटपाबाबतची माहिती जाणून घेतली असता त्या ठिकाणी एकच गोंधळ दिसून आला तेव्हा तेथील लाभार्थी महिला व पुरुषांना भेटून त्यांच्याकडून त्याचे म्हणणे ऐकून घेत तसे वृत्त प्रसिध्दीस दिले होते.
कामगार कल्याण मंडळाकडून सत्यजित न्यूजची दखल घेत संबंधित ठेकेदाराकडून माहिती जाणून घेतली असून लाभार्थ्यांना भांडी वाटप करतांना गोंधळ होऊ नये म्हणून तालुकानिहाय व तालुक्याच्या ठिकाणी भांडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तालुकानिहाय भांडी वाटपाचे नियोजन करण्यासाठी दोन दिवस भांडी वाटप बंद करण्यात आले असून भडगाव येथे कोणत्याही लाभार्थ्यांनी भांडी घेण्यासाठी येऊ नये असे आवाहन संबंधित वितरण व्यवस्थेने केले असून तालुकानिहाय तालुकास्तरीय नियोजन करुन प्रत्येक लाभार्थ्यांना भांडी वाटप करण्यात येणार आहे.
तरी पुढील दोन दिवसानंतर तालुकास्तरीय भाडी वाटपाचे नियोजन करुन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भांडी वाटपाची दिनांक व ठिकाण कळवण्यात येणार असून लाभार्थ्यांनी त्याठिकाणी जाऊन भांड्यांचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८७८८१८९७०१, ९७६५९९२७५१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
(महत्वाची सूचना)
केंद्र सरकार व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रोजगारांना निशुल्क भांडी वाटप करण्यात येत आहेत. परंतु संपूर्ण जळगाव जिल्ह्यात काही तरुण व तरुणी गावागावात फिरुन आम्ही तुम्हाला भांड्याचा लाभ मिळवून देतो असे सांगून पैसे जमा करत आहेत. परंतु ही भांडी मिळवून घेण्यासाठी फक्त आणि फक्त एक रुपया नाममात्र भरुन लाभ घेता येतो अशी माहिती समोर आली आहे. म्हणून अशा लोकांपासून सावध रहावे असे आवाहन सत्यजित न्यूज कडून करण्यात येत असून असे पैसे जमा करणारे तरुण व तरुणी गावागावात आढळून आल्यास भ्रमणध्वनीवर क्रमांक ९९७५६६६५२१ या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.