पाचोरा येथील श्री. गो. से. हायकूलला आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०६/२०२२
आज २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस यानिमित्ताने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये योगासने करुन योगा दिवस साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आज सकाळी श्री. गो. से. हायस्कूलच्या प्रांगणात योगाचार्य प्राध्यापक डॉक्टर मा. श्री. अतुल सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली योगासन वर्ग घेण्यात आला. यावेळी योगाचार्यांनी स्वता योगासने करुन दाखवत शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने कशी करायची याबद्दल सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन करत विद्यार्थी व विद्यार्थीनींनीकडून योगासने करुन घेतली.
तसेच आपल्या आयुष्यात निरोगी राहण्यासाठी योगासनांची माहिती देत नियमितपणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने केल्यास मनुष्याचे आयुष्य तर वाढतेच सोबतच शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढून मनुष्य हा निरोगी व शतायुषी जीवन जगु शकतो हे ऋषी, मुनींच्या जीवनावर आधारित मुद्दे सांगून उदाहरणांसह पटवून देण्यात आले.
तदनंतर योगा दिनानिमित्ताने योगासनांची आयुष्यात काय व का आवश्यकता आहे. हे चित्रकलेच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थीनींनी योगासनांची वेगवेगळ्या स्थितीत असलेली सुरेख चित्रे रेखाटून या चित्रातून योसनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केला. ही चित्रकला स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कलाशिक्षक मा. श्री. प्रमोद पाटील, मा. श्री. सुबोध कांतायन, ज्योती पाटील यांनी विद्यार्थ्यांना अमोल मार्गदर्शन करत अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला पाचोरा पंचायत समिती विस्तार अधिकारी या. श्री. समाधान पाटील, मुख्याध्यापक मा. श्री. सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील, एन आर पाटील ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री. आर. बी. बोरसे यांनी तर आभारप्रदर्शन या. श्री. रविंद्र पाटील केले.