गोंडगाव येथील झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी परवा पिंपळगाव हरेश्वर बंदची हाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०८/२०२३
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कु. कल्याणी या बालवयातील मुलीवर एका नराधमाने अत्याचार करुन तीला जिवे ठार मरले या घटनेचा निषेध करुन या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी तसेच मागील तीन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर गावात एक मतिमंद मुलीचा एका साठ वर्षीय इसमाने विनयभंग केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी परवा दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ बुधवार रोजी संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय पिंपळगाव हरेश्वर येथील सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.
दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ बुधवार रोजी सकाळी आठ वाजता ग्रामविकास विद्यालयातील शाळकरी मुलामुलींना सोबत घेत संपूर्ण पिंपळगाव हरेश्वर गावातून मुक मोर्चा काढण्यात येणार असून या मूक मोर्चात सगळ्यांनी सहभागी होऊन कल्याणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील एका मतिमंद मुलीचा विनयभंग करणाराला कठोर शिक्षा व्हावी याकरिता व निषेध करण्यासाठी सगळ्यांनी या मुक मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केले आहे.
या बैठकीत गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी, शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते व पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यकर्ते, ग्राम पंचायत सदस्य, गावातील तरुणवर्ग, बजरंग दल कार्यकर्ते, गावातील प्रतिष्टीत व्यक्ती व बहुसंख्य महिला, पुरुऊ उपस्तित होते.