जोरदार पाऊस व वादळात तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा तश्याच पडून, परिसरातील रहिवाश्यांमध्ये भिंतीचे वातावरण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१०/२०२२

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ मंगळवार रोजी सकाळी तीन ते साडेपाच वाजेच्या दरम्यान जोरदार वादळासह पाऊस झाला या वादळात मराठी मुलांच्या शाळेच्या मागील बाजूस असलेल्या वस्तीतून कृषी विभागाच्या पंपासाठी टाकण्यात आलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य विद्युत वाहिनीच्या तारा तुटून पडल्या सुदैवाने या तारा तुटून पडल्या तेव्हा विद्युत प्रवाह बंद होता अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती असे त्या परिसरातील रहिवाशांनी सांगितले.

या विद्युत वाहिनीच्या तारा तुटून पडल्यानंतर त्या भागातील रहिवाशांनी विद्युत वितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही माहिती देऊन या तारा हटवण्यासाठी विनंती केली होती. मात्र ही माहिती दिल्यानंतर सुध्दा विद्युत वितरण कंपनीकडून एकही कर्मचारी किंवा जबाबदार अधिकारी यांनी या परिसरात ढुंकूनही न पहाता ठेकेदारांची माणसं येतील व ते विद्युत वाहिनीच्या तारांचे काम करतील असे उत्तर भ्रमणध्वनीवर देऊन आपले हात झटकले असून आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ बुधवार सकाळी चार वाजेपर्यंत तारा घराच्या छतावर, अंगणात व वापराच्या रस्त्यावर तश्याच पडून असल्याने या परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारण एखाद्यावेळेस वादळीवाऱ्यासह पुन्हा पाऊस आल्यावर एकमेका खालुन गेलेल्या काही विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरु आहे जर का वादळाने या प्रवाह सुरु असलेल्या तारांचा व पडलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण झाल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. म्हणून या तारा लवकरात, लवकर काढण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

ब्रेकिंग बातम्या