अंबे वडगाव येथे प.पु.प.मं.यळमकर बाबाजी यांच्या हस्ते सर्वज्ञ रसवंतीचा शुभारंभ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील अमोल सुधाकर सुर्यवंशी व समाधान बाबूराव सुर्यवंशी यांनी नोकरीच्या मागे न धावता अंबे वडगाव येथून जवळच वरखेडी रस्त्यालगत सर्वज्ञ रसवंतीचा स्वताचा व्यवसाय सुरु केला आहे.
या सर्वज्ञ रसवंतीचा शुभारंभ अंबे वडगाव येथील पारीमांडल्या महानुभाव आश्रमाचे परमपूज्य, परममंहंत, आचार्य श्री. यळमकर बाबा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी प्रथम परमपूज्य, परममंहंत, आचार्य श्री. यळमकर बाबा यांच्या हस्ते व महंत श्री. हंसराज दादा, महंत श्री. मोहनदास बाबाजी यांच्या उपस्थितीत विधीवत पुजन करण्यात आले. नंतर गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चरक पुजन करुन नंतर फीत कापून उदघाटन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी हर्षल वाघ, संजय देवरे, सुधाकर सुर्यवंशी, मुकेश पाटील, अरुणभाऊ पवार, वीरभान पाटील, आबा शिंदे, अमोल वाघ, मोहन टेलर, भास्कर हटकर, संतोष पाटील.(कवी), अनिल शिंदे, जितेंद्र पवार, नंदू वाघ, रमेश पाटील व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.