सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पाचोऱ्यात होली मिलन निमित्त संगीत संध्येचा जल्लोष.

पाचोऱ्यात होली मिलन निमित्त संगीत संध्येचा जल्लोष.

By Satyajeet News
March 25, 2022
405
0
Share:
Post Views: 53
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०३/२०२२

पाचोरा येथील जूनियर चेंबर ऑफ इंडिया (जे.सी.एस.) शाखा पाचोरा आणि रोटरी क्लब ऑफ पाचोरा, भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने होली मिलन निमित्त आयोजित संगीत संध्या जल्लोष पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. दिनांक १९ मार्च २०२२ शनिवार रोजी बनोटीवाला फार्म हाऊसच्या हिरवळीवर झालेल्या या कार्यक्रमात रंगांची उधळण आणि संगीत सुरांची मैफिल संस्मरणीय ठरली.

जे.सी.आय. व रोटरी क्लब च्या संयुक्त विद्यमाने द म्युझिक्रॅट्स युनायटेड ग्रुप मुंबई च्या संगीत सुरांनी होली मिलन संध्येला रंगत आणली. गणेश वंदना ने सुरू झालेल्या या संगीत संध्येत लोकप्रिय हिंदी- मराठी चित्रपटातील तसेच चिरतरुण अल्बम गीते सादर करण्यात आली. रोटरी क्लबचे उपप्रांतपाल रो. राजेश बाबूजी मोर यांच्या संकल्पनेतून ही संगीत संध्या घेण्यात आली. द म्युझिक्रॅट युनायटेड ग्रुप मधील मुख्य गायक शुभम साबळे, पर्कशन वाद्य वादक प्रीतम गच्‍चे, आणि गिटारिस्ट तथा गायक अथर्व कानेटकर यांनी उपस्थितांची मने जिंकली.

या संगीत संध्येस जय किरण प्रभाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी नृत्याविष्कार सादर करून प्रदीर्घ कार्यक्रमाची गोडी वाढवली. आश्विनी जळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी जळतकर हिने सोलो नृत्य आणि विद्यार्थिनीच्या दोन समूह नृत्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. या समूह नृत्यामध्ये सारिका पाटील, तनिष्का पाटील, भावीका, सायली, समृद्धी, सुप्रिया, निकिता, आकांक्षा व वैष्णवी इत्यादी विद्यार्थिनींनी भाग घेतला.

कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला स्वागत कमानी जवळच रंग लावून व त्यांच्यावर रंगाची उधळण करून स्वागत केले जात होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रो. डॉ. बाळकृष्ण पाटील व जे.सी. रोहित रिझानी यांनी प्रास्ताविक सादर केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपप्रांतपाल राजेश मोर यांचा जे.सी. जीवन जैन यांनी तर जेसिस चे झोन उपाध्यक्ष जे.सी. मयुर दायमा यांचा रो.डॉ. अमोल जाधव यांनी सत्कार केला. बनोटीवाला परिवाराचे ज्येष्ठ सदस्य कांतीलाल जैन यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. रो.डॉ. पंकज शिंदे आणि जे. सी. पियुष अग्रवाल यांनी आभार मानले. रो.प्रा. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला रोटरी व जेसिस क्लबचे सर्व पदाधिकारी सदस्य सहपरिवार उपस्थित होते. रो. निलेश कोटेचा, ज्युनियर जे.सी.मीतेश जैन व त्यांच्या सर्व तरुण सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कुऱ्हाड खुर्द शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार, ...

Next Article

उद्धवा अजब तुझे सरकार, फक्त आमदार एके ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाच्या पाचोरा तालुका मुख्य संपर्क प्रमुख पदी दिनेश चौधरी यांची निवड.

    June 20, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव येथे लम्पी आजाराने बैल दगावला.

    October 20, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    शिंदाड येथील प्लॉट धारकांची फसवणूक, लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता.

    June 20, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत लोकसहकार व नम्रता पॅनलमध्ये सरळ लढत.

    May 28, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव परिसरात तो आला म्हणजे ती जाते, विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार.

    June 11, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी माजी सैनिकाचा अनोखा उपक्रम मतदान करा व दुरुस्तीच्या दरात सुट मिळवा.

    May 8, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • निधन वार्ता

    हाजी सुपडाबाई काकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

  • आपलं जळगाव

    बिलवाडी येथील चर्मकार समाजाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पाचोरा प्रांत अधिकारी यांना निवेदन.

  • आपलं जळगाव

    महाराष्ट्र हुतात्मा दिन विनम्र आदरांजली

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज