माणुसकी समुहाच्या चौथ्या वर्धापनदिना निमित्ताने राज्यस्तरीय “सेवा गौरव” पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२१/११/२०२०
औरंगाबाद- सालाबादप्रमाणे याही वर्षी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या व माणुसकी समुहाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील तळागाळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दात्यांचा सामाजिक बांधिलकि म्हणुन सेवा- गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यात
सामाजिक कार्य,आरोग्य सेवक,महाराष्ट्र पोलीस,कोवी ड योद्धा, शिक्षक,क्रीडा,युवा उद्योजक,कवी,पत्रकार,
कृषी भुषण,भारुडरत्न तथा शाहिर,आदिनीं सेवा गौरव पुरस्कार साठी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी केले आहे.
सेवा गौरव पुरस्कारांमध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह ,एक पुस्तक आणि शाल श्रीफळ,एक वृक्ष देऊन गौरविले जाणार आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या शुभहस्ते सेवा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
तरी महाराष्ट्र राज्यातील आदर्श व्यक्तीमत्वानी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव बनवून दि.०६ डिसेंबर २०२० पर्यंत खालील दिलेल्या पत्यावर पाठवावे. प्रस्ताव पाठविल्यावरच निवड समिती निकाल जाहीर करेल…
*पत्ता:-समाजसेवक सुमित पंडित संस्थापक अध्यक्ष, सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्ण सेवा समुह शासकीय रुग्णलय घाटि औरंगाबाद.प्लाट 60 हरी ओम नगर जटवाडा रोड हर्सुल औरंगाबाद ता.जी.औरंगाबाद पिनकोड 431001 मो.7588928822*
*प्रस्ताव नमुना*
(१) संपूर्ण नाव:-
(२)जन्म दिनांक:-
(३)लिंग. :-
(४)संपूर्ण पत्ता. :-
(५)मोबाईल क्र. :-
(६)कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव:-
(७)कोणत्या पदावर कार्यरत आहे :-
(८)कार्यरत असल्यास पदावरील अनुभव:-
(९)यापूर्वी मिळालेला विशेष पुरस्कार :-
(१०) आपले उल्लेखनीय कार्य :-
(वरील नमुन्यात आपली संपूर्ण माहिती पासपोर्ट फोटो सह दिनांक ०६ डिसेंबर पूर्वी आमच्या कार्यालयात अथवा उपरोक्त व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावे.)