पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचे धाडसत्र सुरु , जनतेतून समाधान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२१/११/२०२०
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील चरणसिंग महारु राठोड, ग्रामस्थ व महिलांनी गावपरिसरातील सट्टा, पत्ता, गावठी व देशीदारुची खुलेआम सुरु असलेले अवैधधंदे बंद करण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन, वरीष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन अवैधधंदे बंद न झाल्यास दिनांक २७ नोव्हेंबर शुक्रवारपासून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
याचीच दखल घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांन सह अंबे वडगाव, अंबे वडगाव बुद्रुक, अबे वडगाव खुर्द येथील अवैधधंदे करणारांच्या घरी धाडसत्र सुरू केल्याने अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले असून पिंपळगाव पोलिसांनी असेच धाडसत्र सुरु ठेवल्यास नक्कीच अवैधधंदे बंद होतील असे मत पंचक्रोशीतुन व्यक्त केलेजात असून या कामगिरी बद्दल पिंपळगाव पोलीसांचे आभार मानले आहेत.
【पाचोरा तालुक्यासह जिल्हाभर गावागावात देशी व गावठीदारुची खुलेआम अवैध विक्री होत आहे. परंतु या दारुबंदी करीता जिल्हा व तालुकास्तरावर असलेले दारुबंदी खात्याचे अधिकारी मात्र हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून असल्याने दारुबंदी अधिकारी व कर्मचारी यांच्या विषयी जनतेतून तिव्र संताप व्यक्त केला जात असून हे खाते फक्त नावालाच असल्याचे बोलले जात आहे.
तर काही ठीकाणी यांचे व अवैधरित्या दारुची विक्री करणारांशी जवळचे संबंध असल्याचे समजते.】
{ग्रामस्थांनी अवैधधंदे विरोधात पुकारलेले आंदोलन व पिंपळगाव पोलीसांचे धाडसत्र सुरु झाल्यापासून अवैधधंदे करणारांनी आपपल्या परिसरात हमरस्त्यावर व चौकात गुप्त खबरे नेमले असून पोलिस गाडी कींवा पोलीस दिसल्यास हे गुप्त खबरे भ्रमणध्वनीवर अवैधधंदे करणारांना माहीत देत असतात म्हणून बऱ्याचवेळा धाडसत्र राबवून सुध्दा अवैधधंदे करणारे सापडत नाहीत असे निदर्शनास येत.}
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी धाडसत्र सुरु केल्यापासून अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले आहे. तरी पोलिसांनी असेच धाडसत्र राबवून हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केले जाते आहे.