पिंपळगाव हरेश्वर येथे विविध उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे येथे ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढून सोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंत्ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सार्वजनिक_शिवजन्मोत्सव_समिती_पिंपळगांव_हरेश्वर आयोजित_शिवजन्मोत्सव_सोहळा_२०२२ ५. कि.मी. पुरुष व ३ कि. मी. महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले होते.. त्यावेळी स्पर्धेला महाराष्ट्रभरातून खेळाडूनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.. त्यात जळगाव, धुळे, नाशिक, नागपूर, ठाणे, कल्याण,(मुंबई),संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, लातूर, अकोला, नांदेड़, बीड आणि हिंगोली तब्बल १५ जिल्ह्यातील ५५० पेक्षा अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला.. यात_सर्वाधिक_विशेष_बाब_म्हणजे_पिंपळगाव_हरेश्वर_येथे तब्बल_२२०_स्पर्धक_मुक्कामाला_होते
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
पुरूष
प्रथम – दिनकर गुलाब महाले (नाशिक)
द्वितीय – दयानंद विष्णू चौधरी (नाशिक)
तृतीय – प्रदीप उदलसिंग राजपूत (संभाजीनगर)
चतुर्थ- कुलदीप जुगराज चव्हाण (संभाजीनगर) महिला –
प्रथम शकिला बाशा वसावे (नंदुरबार)
द्वितीय वैष्णवी विठ्ठल बाविस्कर (नाशिक)
तृतीय – आरती अर्जुन पावरा ( नंदुरबार )
चतुर्थ – गीतांजली भगवान राऊत (संभाजीनगर)
उत्तेजनार्थ (50 वर्षावरील) रवींद्र सूर्यभान पाटील (भडगाव)
यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांनी छत्रपती चौक शिवाजी नगर येथे सुशोभीकरणासाठी पंधरा लाख रुपये मंजूर करून शिव जयंती दिनी.याचे नारळ फोडून उदघाटन केले अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्ती निमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे सार्वजनिक शिव जयंती समिती व सकल मराठा समाजा तर्फे ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. येथील शिवाजी चौक परिसरापासुन गावातील मुख्य रस्त्याने सदरील मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी मध्ये सर्व समाज बांधव यांनी सहभाग घेतला होता व कालिंका माता मंदिर प्रांगणात मिरवणूकीची सांगता करण्यात आली यावेळी शिवप्रेमीनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज फडकवत,त्यांच्या नावाचा जयजयकार केला.तसेच रस्त्यावर रागोई काडण्यात आली होती.20 व 21.फेब्रुवारी रोजी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती पाचोरा भडगाव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील,शिंदाड-पिंपळगाव हरे गटाचे जि.प सदश्य मधू भाऊ काटे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.शालिकराम मालकर, विघ्णहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉ भूषण मगर डॉ.नीलकंठ पाटील प.स.सद्श्या.ताईसो रत्नप्रभा पाटील पिंपळगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.महेंद्र वाघमारे सकल मराठा समाज अध्यक्ष ईश्वर पाटील मा.श्री.विकासजी लोहार डॉ.शांतीलाल जि. तेली माजी जि.प.सदश्य उद्धव मराठे.,उपसरपंच मा.सुखदेव गीते सर.प्राचार्य विक्रम पाटील जेष्ठ शिव सैनिक राजधार आबा,श्री राजधर पाटील,कोमलसिंग देशमुख,भगवान पाटील,नाना भाऊ सरकार,रवी भाऊ गीते,परेश पाटील संतोष पाटील, भागवत काकडे,तालिब शेख, विनोद महाजन, अंतिम महाजन, अजय तेली बाजीराव गीते, गोविंदा काळे, प्रशांत पाटील,बाजीराव गीते, चंद्रकांत माहोर,सर्व ग्राम पंचायत सदश्य पोलीस कर्मचारी, अरुण राजपूत,रणजित पाटील,संदीप राजपूत संभाजी सरोदे,राकेश खोंडे, रवींद्र पाटील सर्व शिवप्रेमी व शिवभक्त समस्त ग्रामस्थ यांची उपस्तिती होती…