प्रताप कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत, सदगुरु पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करत दमदाटी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणारच. दिलीप जैन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०९/२०२३
अंमळनेर येथील प्रताप कॉलेजमध्ये आज दिनांक ०२ सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी घेण्यात आलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत अमळनेर ग. स. शाळेच्या क्रीडा शिक्षकाने निर्णय देतांना वशिलेबाजी करत निर्णय दिल्याने या ठिकाणी अमळनेर तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी शाब्दिक चकमक होऊन या वादात एका क्रीडा शिक्षकाने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन मनमानी पद्धतीने स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करत दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्या शालेय विद्यार्थ्यांना दमदाटी व धक्काबुक्की करण्यात आली ते विद्यार्थी आज तणावाखाली गेले असून संबंधित मनमानी करणाऱ्या शिक्षकावर रीतसर कारवाई करण्या साठी एका संस्थेचे काही शिक्षक व ज्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की व दमदाटी करण्यात आली ते विद्यार्थी अमळनेर पोलीस स्टेशनला आपली तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते असे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथील प्रताप कॉलेजमध्ये आज दिनांक ०२ सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या हॉलीबॉल स्पर्धेत अमळनेर येथुन जवळच असलेल्या धुळे, अमळनेर रस्त्यावर असलेल्या चोपडाई जवळील सदगुरु पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या १४ वर्ब वयोगटातील मुलांनी भाग घेतला होता. अमळनेर येथील प्रताप कॉलेजमध्ये नियमानुसार हॉलीबॉल स्पर्धा सुरु झाल्या मात्र स्पर्धा सुरु झाल्यावर क्रिडा शिक्षकांनी नको त्या तृटी काढून बाहेरील शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळानुसार गुण न देता मनमानी सुरु केली यावरुन सदगुरु पब्लिक स्कूलचे शिक्षक व अमळनेर येथील क्रीडा शिक्षक यांच्यात मतभेद होऊन शाब्दिक चकमक झाली हा प्रकार येथेच न थांबता वाघ नावाच्या क्रीडा शिक्षकाने स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करत दमदाटी केल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती आले आहे.
क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना दमदाटी व धक्काबुक्की करण्यात आल्यामुळे विद्यार्थी घाबले असून ते मानसिक तणावाखाली आहेत. याच क्रीडा स्पर्धेत पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील दिलीप जैन यांचा मुलगा सत्यजित जैन हा सदगुरु पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असून त्याने ही या हॉलीबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी भाग घेतला होता. परंतु आज खेळा दरम्यान त्याला एका क्रीडा शिक्षकांकडून दमदाटी व धक्काबुक्की झाल्यावर त्याने घाबरुन न जाता एका अनोळखी इसमाची मदत घेत त्यांच्या भ्रमणध्वनीवरून दिलीप जैन यांच्याशी संपर्क साधून रडत, रडतच घडलेला प्रकार सांगितला असल्याने उद्या दिलीप जैन हे अमळनेर पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित क्रीडा शिक्षकाचे विरोधात रीतसर तक्रार दाखल करणार आहेत.
————————————————————
(योग्य त्या कलमाखाली गुन्हा दाखल करणारच, दिलीप जैन.)
अमळनेर येथे घेण्यात आलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत काही तात्विक वाद झाले असतील व स्पर्धा म्हटल्यावर थोडेफार तात्विक वाद होतच असतात परंतु हे वाद शिक्षकांपर्यंत मर्यादित असायला पाहिजे होते. परंतु यात अल्पवयीन १४ वर्षाखालील मुलांना दबावाखाली घेऊन त्यांना दमदाटी व धक्काबुक्की करणे हे संबंधित क्रीडा शिक्षकाचे अशोभनीय वर्तन असल्याचे सांगत आज माझा मुलगा तणावाखाली आला असून त्याला कारण नसतांना दमदाटी व धक्काबुक्की करण्यात आल्यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ खराब झाले असून माझ्या मुलागा भ्रमणध्वनीवर बोलतांना अक्षरशा रडत होता म्हणून मी उद्या संबंधित क्रीडा शिक्षकाचे विरोधात अमळनेर पोलीस स्टेशनला तसेच शिक्षणाधिकारी व शिक्षणमंत्री यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी करणार आहे.