पाचोरा, भडगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष आता, माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या भूमिकेकडे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०७/२०२३
नुकतेच मा. श्री. अजितदादा पवार यांनी भाजप, सेना युती सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भुकंप झाला असून संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून सगळीकडे मा. श्री. अजितदादा पवार यांना स्वार्थासाठी राजकारण करत असल्याचा ठपका ठेवला आहे.
अजितदादा पवारांनी अचानकपणे मा. श्री. देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांच्याशी हातमिळवणी करत काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस नेते मंडळी घेऊन ते आज उपमुख्यमंत्री म्हणून स्वताला मिरवून घेत आहेत. परंतु कालपर्यंत सत्ताधारी व विरोधी पक्षात चाललेला संघर्ष्यात व कलगीतुऱ्यात ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हाणामाऱ्या करून घेत स्वतःची डोके फोडून घेतली ज्येष्ठ नेत्यांच्या भाषणाला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला त्याच कार्यकर्त्यांची आज घरका ना घाटका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
(अजितदादा पवार यांनी रंग बदलतांना सरड्यालाही मागे टाकले अशी जहरी टीका जनमानसातून केली जात आहे.)
या घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता आता माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ हे काकांसोबत रहातात की पुतण्यासोबत जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.