युवतींनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे रहावे – शेतकरी नेते सुनील देवरे प्रतिपादन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०१/२०२२
भारत सरकारच्या खेळ मंत्रालयाने स्थापन केलेल्या नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात युवतींनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे रहावे असे शेतकरी नेते सुनील देवरे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की फक्त एक पध्दतशीरपणे शिक्षण घेत राहणे म्हणजे तुम्ही सक्षम होत आहेत असे मुळीच नाही तर या व्यतिरिक्त कौशल्य विकास प्रशिक्षणच्या माध्यमातून ब्युटी पार्लरसारखे प्रशिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहणे होय.
हे प्रशिक्षण प्रशिक्षण रोशनी बहुउद्देशिय संस्थेच्या सहयोगाने होत असून यात १८ ते २९ वयोगटातील २५ प्रशिक्षणार्थींना सौंदर्य शास्त्राचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते होऊन दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पारोळा तालुका देखरेख संघाचे माजी चेअरमन व संस्थेचे सचिव आबासाहेब प्रकाश पाटील हे होते तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून शेतकरी नेते व संस्थेचे अध्यक्ष सुनील देवरे हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे सी.जी.पाटील,कल्याणी ब्युटी पार्लर च्या संचालिका कल्याणी देवरे,एकता काँम्पयुटर चे राहुल पाटील,मयूर महाजन हे उपस्थित होते.
सी.जी.पाटील. यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जिवनात वेळेला व आपल्यातला कौशल्या किती महत्त्व असते यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मयूर महाजन यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिक्षा पाटील, गायत्री पाटील,अनुष्का पाटील यांनी मेहनत घेतली.