गुजर समाज मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुनील गुजर तर नवयुवक मंडळाच्या अध्यक्षपदी अक्षय गुजर यांची निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०५/२०२३
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे गुजर समाजबांधवांची संख्या मोठी असल्याकारणाने शेंदुर्णी गावात गुजर समाज संघटित राहुन समाजपयोगी कामे करुन समाजोन्नती कामे व्हावीत याकरिता गुजर समाज मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. सन २०१५ पासून या गुजर समाज मंडळाच्या अध्यक्षपदी मा. श्री. सुनील जगन गुजर यांची निवड करण्यात आली आहे. २०२० मध्ये मा. श्री. सुनील गुजर यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला होता. परंतु मध्यंतरी कोराना सारख्या आजाराने धुमाकूळ घातला होता. लॉकडाऊन असल्याकारणाने दोन वर्षांसाठी अध्यक्षपदाची सुत्रे मा. श्री. सुनील गुजर यांच्याच हातात होती.
आता नुकतीच गुजर समाज बांधवांनी जनरल मीटिंग घेऊन सांगोपांग चर्चा केली या चर्चेत मागील आठ वर्षांत सुनील गुजर यांनी स्वताला झोकून देत समाजासाठी चांगले काम केले आहे म्हणून गुजर समाजाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुनील गुजर यांचीच निवड करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात येऊन पुढील पाच वर्षांसाठी सुनील गुजर यांची फेरनिवड करण्यात येऊन इतर सदस्यांना कायम ठेवत त्यात आंशिक बदल करुन पंचासमक्ष रिक्त झालेल्या जागेवर होतकरु तरुणांची नेमणूक करण्यात आली.
यावेळी नियुक्ती होण्यापूर्वी मंडळाचे अध्यक्ष सुनील गुजर यांनी सन २०१५ ते सन २०२३ या कालावधीतील लेखाजोखा वाचून दाखवत संचालक मंडळाच्या सहकार्याने व समस्त गुजर समाजबांधवांनी भरभरुन दिलेल्या प्रतिसादामुळे आम्ही समाजासाठी चांगले काम करु शकलो असे सांगून संपूर्ण गुजर समाज बांधवांचे मनापासून आभार मानले तसेच समाज बांधवांनी आजपर्यंत चाळीस लाख रुपयांच्या देणग्या जमा करुन मंडळाची एक कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे याबाबत मी सर्वांचे आभार मानतो व भविष्यातही अशीच समाजपयोगी कामे करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन आपल्या समाजबांधवांची प्रगती व भरभराटीसाठी प्रयत्न केले जातील असे मत सुनील गुजर यांनी व्यक्त केले. विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाचे उत्कृष्ट कामकाज पाहून अध्यक्ष स्थानी पुन्हा सुनील गुजर यांचेकडे देत संपूर्ण संचालक मंडळ तेच ठेवण्यासाठीचा सर्वांना मते निर्णय घेऊ तेच संचालक मंडळ कायम करण्यात आले.
तसेच याच सभेत तरुणांच्या हाती समिजाची धुरा देण्याच्या अनुषंगाने सरदार वल्लभभाई पटेल मंडळाच्या माध्यमातून नूतन कार्यकारिणी निवडण्यात येऊन मंडळाच्या अध्यक्षपदी अक्षय प्रकाश गुजर, उपाध्यक्षपदी संजय देवीदास गुजर, नितीन अशोक गुजर यांची निवड करण्यात आली.
समाजातील सेवाधारी कडोबा आनंदा गुजर, अमृत शिवदास गुजर व समाजातील सेवानिवृत्त सीमा सैनिक वासुदेव गुजर, किरण गुजर, भानुदास गुजर, यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. तसेच देणगीदारांचे आभार मानून जनरल सभेचे अध्यक्ष कडोबा सोनजी गुजर यांच्या परवानगीने सभा संपन्न झाली.