कुऱ्हाड खुर्द येथे शंभर जेष्ठ नागरिकांना लसीकरणाचा लाभ.

चेतन पाटील.(कुऱ्हाड)
दिनांक~०७/०५/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथे दिनांक ०६ मे गुरुवारी ४५ वर्षांपासून तर ६० वर्ष वयापर्यंतच्या शंभर जेष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आले.
या लसीकरणासाठी लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मा.श्री. देवेंद्र पाटील, आरोग्यसेवक, आरोग्यसेवीका यांनी अथक परिश्रम घेतले.
तसेच डॉ. मा.श्री. प्रदिप महाजन, सरपंच सौ.संगीताताई भगत, श्री. अशोक देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. अशोक बोरसे, श्री. बंटी वायरमन, श्री. पंकज रेणुके यांचे विशेष सहकार्य लाभले.
सुचना
कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, सांगवी, साजगाव, बिल्धी, लाख तांडा या गावपरिसरात सत्यजित न्यूज प्रतिनिधी म्हणून चेतन पाटील. यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तरी आपल्या परिसरातील अडी, अडचणी, समस्या, समाजसेवी उपक्रम, सामाजिक कार्यक्रम इतर दैनंदिन घडामोडींची प्रसिद्धी देण्यासाठी चेतन पाटील यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती