जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे ५११ रुग्ण आढळले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०३/२०२१
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा ६४ हजार ५४३ वर : आतापर्यंत ५८ हजार ५३५ रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत १४०४ रुग्णांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तब्बल ५११ रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार ५४३ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ५८ हजार ५३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार ४०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी ३१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू ओढवला.
रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर २६७
जळगाव ग्रामीण १२
भुसावळ ३१
अमळनेर ०१
चोपडा ३८
पाचोरा ००
भडगाव ००
धरणगाव १६
यावल ०२
एरंडोल ०७
जामनेर ७८
रावेर ०६
पारोळा ०६
चाळीसगाव १२
मुक्ताईनगर २१
बोदवड १४
अन्य जिल्हा ००
२४ तासात एका रुग्णाचा मृत्यू
गेल्या २४ तासात भुसावळ तालुक्यातील ५७ वर्षीय पुरूषाचा मानस हॉस्पीटल, जळगाव येथे मृत्यू झाला.