निलेश फंड.(भुसावळ)
दिनांक~२५/१०/२०२२

आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही उदात्त भावना बाळगून भुसावळ येथील रक्तदाते टीम व मध्य रेल्वे भारत स्काऊट गाईडच्या माध्यमातून दिपावलीच्या सणानिमित्त दिनांक २४ ऑक्टोंबर २०२२ सोमवार रोजी जिल्हा शिबिर मैदान () येथे कपडे व खाद्यपदार्थांचे संकलन करुन लाल चर्च, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, रेल्वे परिसर, भिलवाडी इत्यादी परिसरातील गोरगरीब लोकांना वस्त्र दान व फराळ वाटप करण्यात आले.

भुसावळचे रक्तदाते सदस्य श्री. निलेश फंड यांनी गोरगरिबांना वस्र दान व खाद्यपदार्थांचे (फराळाचे) वाटप करण्यासाठी पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी भारत स्काऊट गाईडचे सदस्य यांनी मोलाची मदत केली. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुसावळचे रक्तदाते संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश फंड, श्री. अनिल कुमार तिवारी, शेख सलीम, श्री, मुकेश शर्मा, तनिष भोसले, कोमल परदेशी, राजश्री नेवे व स्काऊट गाईड टीम आणि रक्तदाते टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.