प्रभागातील विकासकामे न झाल्यास माजी उपनगराध्यक्षा सौ. हर्षालीताई जडे यांचा आंदोलनाचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०४/२०२३
मागील काळात सौ. हर्षालीताई जडे या उपनगराध्यक्षा असतांना यांच्या कार्यकाळात पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये असलेल्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व बालोद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी रितसर मिळाली आहे. परंतु ही विकासकामे अद्यापही करण्यात आली नसल्याने रस्त्या अभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच जवळच एक बालोद्यानाचे सुशोभीकरण मंजूर असूनही तेही काम अद्यापही करण्यात आले नसल्याचे सांगत या कामांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत ही कामे तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सौ. हर्षालीताई जडे यांनी एका निवेदनाद्वारे पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दिला आहे.
या निवेदनात माजी नगराध्यक्षा सौ. हर्षालीताई जडे यांनी उपनगराध्यक्षा असतांना देशमुख वाडी भागातील बालोद्यानाचे सुशोभीकरण व बाजूचे रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, पंचमुखी हनुमान ते आठवडे बाजार रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, पिंजारीवाडा भागातील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, कलाल गल्ली व परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, ठाकुर वाड परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे हि कामे मंजूर करुन घेतली आहेत.
परंतु तदनंतर माजी उपनगराध्यक्षा सौ. हर्षालीताई जडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ह्या मंजूर झालेल्या विकासकामांकडे नगरपरिषदेवर कार्यरत असलेले मुख्याधिकारी व प्रशासक ही विकासकामे करत नसल्याने मी अनेकवेळा लेखी निवेदन व तोंडी तक्रारी करुनही आजपर्यंत वरीलपैकी एकही विकासकामे करण्यासाठी सुरुवात झाली नसल्याचे सांगत या विकासकामांकडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन प्रभाग क्रमांक चार मधील स्थानिक नागरिकांना वेठीस धरत असल्याचे निवेदनात नमूद केले असून वरील नमूद केलेली विकासकामे त्वरित सुरु न केल्यास नगरपरिषदेच्या विरोधात आंदलनाचा पावित्रा घ्यावा लागेल असा इशारा सौ. हर्षालीताई जडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.