श्रद्धेय तात्यासाहेब आर. ओ. पाटील. यांच्या पुण्यतिथी निमित्त दिव्यांगांना तीन चाकी रिक्षाचे वाटप

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०३/२०२३

पाचोरा शिवसेनाचे माजी आमदार तथा निर्मल सीडसचे संस्थापकीय अध्यक्ष स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील. यांची आज २८ मार्च रोजी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीचे औचित्य साधून निर्मल सीड्स, निर्मल फाउंडेशन व पाचोरा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी दिव्यांगांना मोफत तीन चाकी सायकलचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथे पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला असून सकाळी १० वाजता तात्यासाहेबांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करण्यात येईल. तालुक्यातील सर्व शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

पुष्पांजली अर्पण करण्यासाठी कृषी क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, वितरक व विक्रेता, व्यापारी बांधव, सर्व हितचिंतक व मित्रमंडळी सर्वांनी सकाळी दहा वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये उपस्थित रहावे असे आवाहन निर्मल सीड्स, निर्मल फाउंडेशन व पाचोरा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या