अंबे वडगाव येथे देवाला सोडलेल्या सांड गायीच्या चोरी प्रकरणात गावातील व्यक्तीचा हात असल्याचा ग्रामस्थांचा संशय.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२२

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे अंबिका देवीचे जागृत देवस्थान असल्याने अंबे वडगाव गावसह महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील भाविक, भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात व आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस कबुल करुन इच्छापूर्ती झाल्यावर नवस फेडण्यासाठी येतात. याच प्रकारे शेतकरी बांधव या देवीच्या नावाने गाय, गोऱ्हा, बोकड, कोंबडा हे प्राणी जिवंत देवीच्या नावाने सोडतात या मोकाट सोडलेल्या गुरा, ढोरांना भाविक, भक्त गावात व शेती, शिवारात चांगल्याप्रकारे सांभाळतात.

अश्याच अंबिका देवीच्या नावाने सांड सोडलेल्या पाच गायी त्यांची वासर गावात आजही आहेत. परंतु याच पाचा जनावरांपैकी एक गाय, एक वासरु मागील आठवड्यात अचानकपणे बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ह्या अचानकपणे बेपत्ता झालेल्या गाया व वासराचा गावातील नागरिकांनी सगळीकडे शोध घेतला परंतु गाय व वासरु मिळून न आल्यामुळे ही गुरे गावातील एका व्यक्तीच्या मदतीने चोरुन नेल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला असून बाहेरगावाहून येणाऱ्या दोन मांसविक्रेत्यांच्या व गावातील एका संशयित व्यक्तीच्या नावाची जोरदार चर्चा ग्रामस्थांमधून ऐकायला मिळत आहे. तसेच या चोरी गेलेल्या गाय व वासराच्या चोरीचा तपास लवकरच लागून चोरट्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच गावातील पशुधन पालकांनी आपापल्या गुरा, ढोरांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

जाहीर आवाहन ~ चोरीला गेलेल्या गाय व वासराबद्दल कुणालाही काही माहिती असल्यास संबंधितांनी याबाबत सत्यजित न्यूजकडे गुप्त माहिती कळवावी माहिती देणारस योग्य ते बक्षीस दिले जाईल व माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन दिलीप जैन यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या