मालखेडा येथे (टोणगा) हेल्यावर अज्ञाकडून ॲसिड हल्ला, गावातील पशू प्रेमींन कडून संबधीतावर कारवाईची मागणी
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२१
जामनेर तालुक्याच्या पश्चिमेकडील सरहद्दीवर असलेल्या मालखेडा गावात एका अज्ञात इसमाने देवाच्या नावाने सोडलेल्या सांड हेल्यावर ॲसिड हल्ला केल्याने मालखेडा गावातील पशु प्रेमींनी या हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधितांवर कारवाईची करण्यात यावी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कळमसरा येथील एका भाविक भक्तांने श्रध्देने म्हसोबाच्या नावाने एक हेला सांड सोडला असून हा हेला मालखेडा गावाजवळच राखीव जंगल असल्यामुळे मालखेडा गावी येऊन राहू लागला. परंतु हा सांड हेला गावातील एका इसमाला खटकत असल्याने त्याने त्या साड हेल्यावर काही दिवसापूर्वी ऍसिड हल्ला करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
या ऍसिड हल्ल्यामुळे हेला पूर्णपणे भाजला असून त्याचा कमरेपासून मागील भाग संपूर्ण जळाला आहे. ऍसिडमुळे त्याच्या कातडी सह मास जळाले असल्याने ते मास लोंबकळत आहे. या वेदना घेऊन हेला गावभर हंबरडा फोडत असल्याने ही परिस्थिती पाहून गावातील काही पशू प्रेमींनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून स्वखर्चाने उपचार सुरू केले आहेत.
परंतु एखाद्या मुक्या प्राण्यावर हल्ला करणे हे माणुसकीला शोधणारे नसून हा ऍसिड हल्ला करणाराची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता काही लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, मालखेडा गावातच एका इसमाकडे जवळपास पंचवीस म्हशी असून तो दुग्ध व्यवसाय करतो. तो त्याच्या म्हशी गावाजवळील एका ठिकाणी बांधत असून त्या तबेल्याच्या ठिकाणी हा सांड सोडलेला हेला वारंवार जाऊन येथील चारा फस्त करत होता. म्हणून या त्रासाला कंटाळून संबंधित इसमाने स्वतःच्या म्हशींच्या बचावासाठी हे अघोरी कृत्य केल्याचे समोर येत आहे.
परंतु सर्वसामान्य व सुज्ञ नागरिकांच्या मते संबंधित म्हशीच्या मालकाने त्याच्या म्हशीच्या सुरक्षिततेसाठी तार कंपाउंड करणे किंवा बंदिस्त गोठ्यात म्हशींची व्यवस्था केली पाहिजे परंतु त्याने असे न करता स्वहितासाठी चक्क सांडलेल्या सोडलेल्या हेल्यावरच ऍसिड हल्ला करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.