वेताळ बांबर्डे येथील ४६ वर्षीय युवक बेपत्ता ; वडिलांनी दिली पोलीस ठाण्यात फिर्याद
कुडाळ
वेताळ बांबर्डे तांबेवाडी येथील ४६ वर्षीय लक्ष्मण सूर्यकांत सावंत हे घरात कोणालाही न सांगता निघून गेले आहेत याबाबत त्यांचे वडील सूर्यकांत सावंत यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
सूर्यकांत सावंत हे मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत होते ते सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या मूळ गावी वेताळ बांबर्डे येथे आले त्यांचा मुलगा लक्ष्मण सावंत हा मुंबई येथे सिक्युरिटी गार्डचे काम करत होता त्याला पोलीस दलात दाखल व्हायचे होते. मात्र त्याची भरती होऊ शकली नाही तेव्हापासून तो मानसिक आजारी आहे दरम्यान सध्या तो वेताळ बांबर्डे येथे आपल्या कुटुंबासह राहत आहे १५ फेब्रुवारी रोजी सायं. ४ वा. घरात कोणालाही न सांगता तो घरातून निघून गेला दरम्यान हा इसम हुमरमळा येथून ओरोसच्या दिशेने चालत जात असल्याचे निदर्शनास आले होते त्यानंतर मात्र शोध घेतला असता तो सापडून आलेला नाही. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्याचे वडील सूर्यकांत सावंत यांनी फिर्याद दाखल केली आहे.