पाचोरा पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीतर्फे पोलीस निरीक्षक मा.श्री. किसनराव पाटील यांचा सत्कार
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा पोलीस स्टेशनला नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक माननीय श्री किसनराव नजन पाटील साहेब यांचा पाचोरा पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती सदस्य व जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सौ सुनिता मांडोळे व पाचोरा तालुका जिजाऊ ब्रिगेड प्रतिभा पाटील सचिव योगिता पांगारे व प्राध्यापक राजेश मांडोळे यांनी पोलीस स्टेशनला येऊन नुकताच सत्कार केला.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. किसनराव पाटील. यांनी महिलांशी संवाद साधून कायदासूव्यस्थे बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेतली. पाचोरा शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने लांबल्याच्या घटना घडत आहेत. या बाबतीत महिलांनी घाबरून न जाता आपल्या कॉलनी परिसरात अनोळखी पुरुष व कोणी व्यक्ती संशयास्पद फिरतांना आढळून आल्यास त्वरित पोलिसांना कळवावे तसेच फेरीवाले यांना थेट घरात प्रवेश देऊनये तसेच कामानिमित्त घराबाहेर पडतांना अंगावर जास्त दागदागिने व किमतीवस्तु बाळगू नये तसेच आपल्या सामानाची आपण काळजी घ्यावी अश्या सुचनादेत माताभगिनींना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या