पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा.
संजय पाटील.(पहान)
दिनांक~१७/५/२०२१
पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मा.श्री.अमित साळुंखे यांनी डेंग्यू पासून बचाव करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे व काय उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती दिली.
यात प्रत्येकाने आपल्या घरपरिसरात कुठेही पाण्याचे डबके किंवा पाणी साचेल असी दलदल होऊ देऊ नये. प्रत्येकाने आपल्या घरातील हौद,माठ,पाण्याची टाकी व इतर पाण्याची भांडी घासून स्वच्छ करत एकदिवस रिकामी ठेवत कोरडा दिवस पाळण्यात यावा,घरपरिसरात स्वच्छता ठेवत पाणी साठवणूक केलेल्या भांड्यावर व टाकीवर झाकण ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून या पाण्याच्या ठिकाणी डासांची निर्मिती थांबेल व डेंग्यूची अंडी तसेच अळी तयार होणार नाही.
आपल्या घरात कुणालाही ताप आल्यावर त्वरित रक्ततपासणी करुन घ्यावी, मच्छरदाणीचा वापर करावा,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून आरोग्याची काळजी घ्यावी अशी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे वेळी श्री.जी.एस.काकडे, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी हजर होते.