छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, नवनिर्माण सेनेतर्फे रक्तदान शिबीर व शिवचरित्राचे वाटप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०२/२०२२
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तताने पाचोरा येथे नवनिर्माण सेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे ठिकाणी शिवचरित्राचे वाटप करण्यात येणार आहे.
यामागील हेतू म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (जन्मोत्सव) नाचून नव्हे तर वाचून साजरी करावी हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन शिवचरित्राचे वाटप करण्यात येणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महारांचे जीवनचरित्र आजच्या तरुण पिढीच्या वाचनात आल्याशिवाय आपल्याला त्याचे महत्त्व कळणार नाही. व आपल्या जीवनाचे सार्थक होणार नाही. म्हणून शिवचरित्र वाचाल तरच टिकाल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असा हेतू डोळ्यासमोर ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी सिध्दीविनायक हॉस्पिटल, रेड प्लस ब्लड बँक यांचे अनमोल सहकार्य मिळणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून अनिलभाऊ वाघ (जिल्हाध्यक्ष म.न.से. जळगांव), स्वप्निल पाटील (सिध्दीविनायक हॉस्पिटल) हे उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या शिबिरात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पाचोरा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.