खड्डा चुकवा व बक्षीस मिळवा पाचोरा, जामनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधींसाठी अनोखी स्पर्धा.

Russian road (federal highway)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/१०२०२२

पाचोरा व जामनेर तालुक्यातील जनतेच्या व वाहनधारकांच्या मागणीनुसार तसेच या रस्त्यावरून जाता, येतांना त्यांना आलेल्या अनुभवावरून सुचलेलेल्या कल्पनेतून जामनेर ते पाचोरा महामार्ग १९ वर शेंदुर्णी ते पाचोरा या अंदाजे २५ किलोमीटर अंतराच्या टप्प्यात (दरम्यान) सत्यजित न्यूज कडून येणाऱ्या दिपावलीच्या शुभ मुहुर्तावर पाचोरा व जामनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार, जिल्हापरिषद व पंचायत समितीचे सभापती, सदस्यांस व ठेकेदारांसाठी चारचाकी व दुचाकी स्वयंचलित वाहन चालवण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींना विनाशुल्क प्रवेश दिला जाणार असून शेंदुर्णी ते पाचोरा दरम्यान वाहन चालवतांना आपल्या वाहनांचा वेग हा तासी पन्नास किलोमीटर असला पाहिजे तसेच या रस्त्यावरून वाहन चालवतांना रस्त्यावरील खड्ड्यांना कोणतीही दुखापत किंवा धक्का लागल्यास स्पर्धकाला तेथेच बाद केले जाईल म्हणजे थोडक्यात शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर असलेल्या एकही खड्यात आपल्या वाहनाचे चाक जाता कामा नये ही काळजी स्पर्धकांनी घ्यायची आहे.


म्हणजेच थोडक्यात खड्डा चुकवा व बक्षीस मिळवा अशी हि स्पर्धा असून या स्पर्धेचे (पंच) परिक्षक म्हणून कमीशन न खाणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जळगाव, जामनेर व पाचोरा येथील अधिकारी रहाणार असून या स्पर्धेचे विजेते ठरवणे व बक्षीस देणे हे त्यांच्याच हातात राहील व अंतिम निर्णय हा संबंधित परिक्षकांचा रहाणार असून स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची कोणतीही सबब एकुण घेतली जाणार नाही.


सुचना~
या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर वाहनचालकांना काही दुखापत किंवा वाहानाची मोडतोड झाल्यास याला स्पर्धक स्वताहा जबाबदार रहातील मात्र अपघात झालाच तर सत्यजित न्यूज कडून फोटो सहीत सचित्र बातमी मोफत देऊन स्पर्धकाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सत्यजित न्यूज प्रयत्नशील राहिल.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रत्येकाला भल्यामोठे बक्षीस देण्यात येणार असून बक्षीसांची रक्कम स्पर्धा सुरु होण्याआधी जाहीर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ब्रेकिंग बातम्या