समोरुन येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात,कोळशाने भरलेला ट्रक उलटला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/१०/२०२२

शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर वडगाव आंबे गावाजवळील लेंडी नाल्याच्या पुलाजवळ समोरुन येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात कोळशाने भरलेला ट्रक अचानकपणे पलटल्याची घटना आज सायंकाळी साडे चार ते पाच वाजेच्यादरम्यान घडली या अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी गावाकडून पाचोरा शहराकडे एम. एच. १८ बी. ए. ८०१७ क्रमांकाचा कोयला भरलेला ट्रक जात असतांना वरखेडी गावाकडून भरधाव वेगाने वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटला ही घटना वडगाव आंबे गावाजवळील लेंडी नाल्याच्या पुलाजवळ घडली असून या पुलाजवळ दोघेही बाजूला मोठमोठे गवत उगवले असल्याने तसेच पुलाचे संरक्षण कठडे तुटलेल्या परिस्थीतीत असल्याकारणाने व रस्त्याच्या बाजूलाच मोठा खड्डा असल्याने ट्रक ड्रायव्हरला समोरुन येणाऱ्या भरधाव वाहनाला वाचतांना अंदाज चुकल्यामुळे कोळशाने भरलेला ट्रक उलटला आहे.

ही घटना घडताच वडगाव आंबे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक ड्रायव्हर व त्याच्या सहाय्यकाला कॅबिनमधून बाहेर काढले सुदैवाने हा ट्रक अजून खाली गेला असता तर या अपघातात जिवीतहानी झाली असती असे प्रत्यक्षदर्शींनी लोकांनी सांगितले.

रस्ता दुरुस्तीची मागणी~
वडगाव आंबे गावाजवळील लेंडी नाल्याच्या पुलाचे तुटलेले संरक्षण कठडे त्वरित बनवून रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्या वर वाढलेले गवत काढून रस्त्यालगत असलेले जिवघेणे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

ब्रेकिंग बातम्या