डॉ. श्याम साळुंखे यांची कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग अभ्यास मंडळावर नियुक्ती
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/११/२०२०
जामनेर तालुक्यातील धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप.सोसायटीच्या अप्पासाहेब रघुनाथराव भावराव गरुड. महाविद्यालय शेंदुर्णीचे उपप्राचार्य आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. श्याम जीवन साळुंखे यांची संगमनेर येथील, डिबीटी स्टार दर्जा तसेच डिएसटी-फिस्ट दर्जा प्राप्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे परिक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त,यासह न्युआर्क, बंगलोर पुनर्मूल्यांकन अ+ दर्जा आणि युजीसी, नवी दिल्ली आणि भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालय, राष्ट्रीय उच्चस्थरीय शिक्षा अभियान (रुसा) यांनी स्वायत्त दर्जा प्रदान केलेल्या,शिक्षण प्रसारक संस्थेचे संगमनेर नगरपालिका आर्टस्, डि. जे. मालपाणी कॉमर्स आणि बी. एन.सारडा सायन्स महाविद्यालय (स्वायत्त) संगमनेर यांच्या स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या “कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग” च्या अभ्यास मंडळावर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. श्याम साळुंखे यांची नियुक्ती ही पुढील ३ वर्षासाठी असणार आहे, आणि या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून अभ्यासक्रम निर्मिती, नावीन्यपूर्ण अध्ययन आणि मूल्यांकन पद्धती सुचविणे, संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने सल्ला व मार्गदर्शन करणे, इ. कार्यात सक्रिय सहभाग असेल.
डॉ. श्याम साळुंखे यांची यापूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगावच्या अकाउंटन्सी अँड कॉस्टिंग या अभ्यास मंडळावर तर प्रताप (स्वायत्त) महाविद्यालय अमळनेर च्या कॉम्प्युटिंग मॅनेजमेंट या अभ्यासमंडळावर नियुक्ती झालेली आहे, यासह डॉ.साळुंखे यांनी आपल्या शैक्षणिक कारकीर्द मध्ये १७ पुस्तकांचे सहलेखक म्हणून लिखाण तर ४० पेक्षा अधिक संशोधन लेख आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय पत्रिकेत प्रसिद्ध केलेले आहेत तसेच महाविद्यालयात न्याक-आयक्यूएसी, एनआयआरएफ, रुसा समन्वयक म्हणून तर मानव संसाधन मंत्रालयाच्या ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशनचे नोडल अधिकारी आणि MyNEP चे अँबेसिडार म्हणून कार्यरत आहेत.
डॉ साळुंखे यांच्या ह्या नियुक्ती बद्दल धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप.सोसायटीचे चेअरमन दादासाहेब श्री संजयराव गरुड, सचिव, मा. श्री. सतिशजी काशिद, सहसचिव मा.भाऊसाहेब श्री. दिपकजी गरुड, संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील आणि सर्व सहकारीवृंद यांनी अभिनंदन केले आले आहे.