शासकीय कर्मच्याऱ्याला मारहाण प्रकरणी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०९/२०२२
कृषी पर्यवेक्षक अधिकाऱ्याला मारहाण व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कन्हैया प्रकाश महाजन वय (३८) राहणार जामनेर धंदा नोकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजपा जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील गोविंद कोटेक्स जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी संचालक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व त्यांच्या दोघ मुलांवर मारहाण व शिवीगाळ तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२७/२२ नुसार भारतीय दंड संहिता १८६० भादवि कलम ३५३/३३२/५०४/५०६ ३४ प्रमाणे पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याच दिवशी गोविंद अग्रवाल यांनीही कृषी पर्यवेक्षक यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या चुकीच्या वर्तनावरुन शेंदुर्णी आऊट पोस्टला तक्रार दाखल केलेली होती.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गोविंद अग्रवाल यांनी शनिवार दिनांक ०३ ऑगस्ट शनिवार रोजी जिल्हा सत्र न्यायालयात जळगाव येथे दोघ मुलांसह स्वताला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले होते. या अर्जावरुन जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश मा. श्री. शरद पवार साहेबांनी तिघांना पंधरा हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला यावेळी गोविंद अग्रवाल यांच्यातर्फे ॲड. अकिल इस्माईल, ॲड. कुणाल पवार यांनी काम पाहिले.