जळगाव जिल्ह्यात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढले ! उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोनवरून चांगलेच झापले !! अवैध धंदे बंद करण्याची दिली ताकीद.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०७/२०२१
जळगाव शहरासह जिल्ह्यात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून जिल्ह्यातील पोलीस अधिकारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विचारातच घेत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडण्यात आली होती.
याची दखल घेत काल दिनांक ३० जुलै शुक्रवारी स्वताहा उपमुख्यमंत्र्यांनी थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोनवरून चांगलेच खडसावले आणि अवैध धंदे बंद करण्याची ताकीद दिली असल्याचे खात्रीपूर्वक समजते. जिल्ह्यात शिवसेनेचे प्रस्थ अधिक असून पालकमंत्री देखील शिवसेनेचेच आहेत. असे असतांना गेल्या वर्षभरात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून काही ठिकाणी राजकारण्यांचे लागेबांधे आहेत.
जिल्ह्यात पोलिस अधिकारी कोणतीही तक्रार मांडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत कोणतीही दाद देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडली.उपमुख्यमंत्र्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून चांगलेच खडसावले आहे.
इतकेच नव्हे तर कुणाच्याही आशीर्वादाने सुरू असलेले अवैद्य धंदे बंद न झाल्यास जळगावात येऊन पत्रकारपरिषद घ्यावी लागेल का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच अवैध धंदे बंद झाल्यानंतर मुंबईला भेटायला येण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पुढील चित्र नक्की बदललेले दिसेल अशी अपेक्षा आहे.
जळगाव जिल्ह्यातील अवैधधंदे बंद करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्र्याना दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सांगावे लागते ही बाब जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमते बाबत अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. समाजसेवा व समाजहिताचा डंका वाजवत सत्ताधारी भाषणबाजी करतात तर दुसरीकडे समाजासाठी घातक बाबींवर कानाडोळा करतात असा आरोप सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे.
मागील महिन्यात जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती पहाता सोशल मीडियावर तसेच प्रसारमाध्यमांनी सगळ्या घटना उघडकीस आणल्या आहेत. दिवसाढवळ्या खुन, जीवघेणे हल्ले, गावठी कट्टा घेऊन फिरणारांची दहशत, गोळीबार, जबरी चोऱ्या, सट्टा, पत्ता, जुगाराचे अड्डे, गावागावात भरवस्तीत अवैधरित्या सुरु असलेले गावठी व देशीदारुचे अड्डे, सोबतच गांजाची विक्री असे बरेचसे अवैधधंदे दिवसाढवळ्या रात्रंदिवस सुरु आहेत.
या अवैधधंद्यामुळे गावपरिसरात व घराघरात अराजकता माजली आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान, स्वस्त धान्य या अवैधधंदे करणारांच्या घरात जात आहे. इतकेच नव्हे तर व्यसनाच्या आहारी गेलेले लोक पूर्तीसाठी घरातील दागदागिने, संसारपयोगी वस्तू इतकेच नव्हे तर माय माऊलीच्या गळ्यातील सौभाग्याचे लेन असलेले मंगळसूत्र हिसकावून घेत आहेत.
यातूनच घराघरातून महिलांना मारझोड, गांजपाठ होत असल्याने या त्रासाला कंटाळून घटस्पोट, आत्महत्या असे प्रकार घडत आहेत.
यासर्व कारणांमुळे एकच पिढी नव्हे तर भावी पिढ्या बरबाद होत आहे. महत्त्वाचे म्हणजे अल्पवयीन मुले, तरुण मुले यांच्यात व्यसनाधीनता वाढत असल्याचे दिसून येते.
मा.श्री.उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार पोलिस प्रशासन काय कारवाई करते याकडे सगळ्याचे लक्ष लागून आहे.
[अजूनही वेळ गेलेली नाही. उशीराका होइना मा.श्री. उपमुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष दिले असल्याने नक्कीच आपला जिल्हा अवैधधंदे व व्यसनमुक्त होइल अशी आशा बाळगु या]