अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली.
—————————————–
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा आज स्मृतीदिन,आपल्या लेकरांची माय होणं फार सोपं असतं मात्र अनाथांचा नाथ होऊन पोटच्या लेकरा वाणी त्यांचा संभाळ करणे वाटतं तितकं सोपं नसतं, आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेले संकट असंख्य अडचणी आंधारलेली काट्याकुट्याची वाट या वाटीतून प्रकाशाचा रस्ता शोधता शोधता हजारो दीनदुबळ्या गरीब अनाथ अशा लेकरांची माय होऊन या लेकरांना शिक्षण देऊन पोटापाण्याला लावून त्यांची लग्न करून सर्वांना सुखी समाधानानं जीवन जगता यावे म्हणून धडपडणार्या माईंच्या आठवणीं दाटून आल्या, काही कामाच्या निमित्ताने माईंच्या आश्रमात जाण्याचा योग आला पाठीवर मायेचा हात फिरवत माई मला म्हणाल्या कुठून आलास बाळा, मी गावाचं नाव सांगितलं माई मी आंबे वडगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणाहून आलो आहे, चटकन माईंचे डोळे चमकले त्यांनी मला जवळ बसायला सांगितलं आणि म्हणाल्या अरे बाबा तुझ्या गावांमध्ये मी आठ दिवस राहिलेले आहे झटकन त्यांनी मन्साराम पाटलांच्या वाड्यात व‌ जैन परीवार्याच्याद देवढीत राहत होते, असं सांगितल्यावर मी अवाक झालो त्यांनी त्यांच्या अश्रमाबद्दल माहिती सांगितली , माझा हा पदर मी लोकांपुढे पसरते त्यातून मिळालेल्या दोन पैशातून हा माझा फाटका संसार चालवत आहे मी माईचे कार्य पाहून क्षणभर स्तब्ध झालो आणि माईंच्या चरण स्पर्श करून माघारी फिरलो. माई बद्दलचा आदर अधिकच दुणावला आत्तापर्यंत प्रसादासारकी भेटलेली अनेक मोठमोठे व्यक्तिमहत्व मी महा प्रसादा सारखे जपून ठेवलेले आहे, त्यातील हा एक महाप्रसाद
माई स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

संतोष पाटील
‌. ७६६६४४७११२